News Flash

वादविवादांमुळे माझेच नुकसान झाले- कंगना रणौत

बड्या नावांसोबत झालेल्या वादांमुळे मात्र कंगनाचेच नुकसान झाले

कंगना रणौत

बॉलिवूडमध्ये आपल्या ठाम भूमिकेसाठी आणि सिनेमांच्या निवडीसाठी काही अभिनेत्री ओळखल्या जातात. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत. बऱ्याच प्रयत्नांनंतर, अडचणींना तोंड दिल्यानंतर आणि समोर येईल त्या प्रत्येक परिस्थितीशी सामना करत कंगना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. पण, २०१७ हे वर्ष तिच्यासाठी फारसे चांगले ठरले नाही असेच म्हणावे लागेल. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कंगनाचे नाव वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले. हृतिक रोशनसोबतच्या रिलेशनशिपचा वाद, करण जोहरसोबतचा घराणेशाहीचा वाद आणि आदित्य पांचोलीसोबतच्या वादामुळे कंगना सतत चर्चेत राहिली.

चित्रपटसृष्टीतील काही बड्या नावांसोबत झालेल्या वादांमुळे मात्र कंगनाचेच नुकसान झाल्याचे कळते. खुद्द कंगनानेच ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयीची माहिती दिली. आपल्याला झालेल्या नुकसानाविषयी सांगताना कंगना म्हणाली, ‘माझ्याकडे येणारे चित्रपटांचे, जाहिरातींचे प्रस्ताव कमी झाले. याचा मला व्यावसायिकरित्या बराच फटका बसला. पुढच्या वर्षी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्याचे माझे स्वप्न होते. पण हा विचार तुर्तास तरी मला पुढे ढकलावा लागत आहे. सध्या मी तीन सिनेमे स्वीकारले आहेत. मनालीमध्ये सुंदर घर आहे, पाली हिलमध्ये एक ऑफिस आहे आणि मी आता हॉवर्डला जातेय. त्यामुळे मला कमी लेखण्याची चूक करु नका.’

सध्या कंगना सगळ्या वादांपासून दूर राहून तिच्या आगामी मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी सिनेमाच्या चित्रीकरणात लक्ष केंद्रित करत आहे. कंगनाला महिलांसाठी एक आदर्श निर्माण करायचा आहे. यासाठी तिची लढण्याचीही तयारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 7:20 pm

Web Title: affect of controversies on kangana ranauts career
Next Stories
1 Aiyaary Trailer: सिद्धार्थ- मनोजची दमदार ‘अय्यारी’
2 मराठी चित्रपटांना प्राइम टाइम द्या- शालिनी ठाकरे
3 ही आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीची मलायका अरोरा
Just Now!
X