News Flash

आफताब शिवदासानीच्या घरी चिमुकलीचं आगमन

आफताबने सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

मस्त चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारा अभिनता आफताब शिवदासानी बाबा झाला आहे. त्याच्या पत्नीने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. आफताब आणि निन दुसांज पहिल्यांदाच आई-बाबा झाल्यामुळे त्यांनी हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आफताबने इन्स्टाग्रामवर आपल्या बाळाच्या पायांचा फोटो शेअर केला आहे.

आफताब आणि निन यांनी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आफताब कलाविश्वापासून दूर असला तरी सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यामुळे त्याच्याविषयी अनेक चर्चा रंगत असतात.  त्यातच आता आफताब बाबा झाल्यामुळे चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण पसरलं आहे. आफताबच्या पत्नीने निनने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. आफताबने इन्स्टाग्रामवर त्याच्या बाळाच्या पायांचा एक फोटो शेअर करत बाबा झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.

दरम्यान, १९९९ साली ‘मस्त’ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारा आफताब सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. मात्र त्याचा पडद्यावरील वावर कमी झाला आहे. ‘आवारा पागल दिवाना’, ‘आंखे, ‘मस्ती’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 11:11 am

Web Title: aftab shivdasani and wife nin dusanj become parents of a baby girl ssj 93
Next Stories
1 अनुपम श्यामसाठी योगी सरकार मदतीसाठी सरसावले; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश
2 …म्हणून आदित्य ठाकरेंनी मानले अक्षय कुमारचे आभार
3 पियूष रानडे उलडणार नवी कथा; ‘अजुनी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X