News Flash

PHOTOS : अभिनेता आफताब शिवदासानीचा श्रीलंकेत पारंपरिक पद्धतीने विवाह

कोणालाच आफताबच्या लग्नाचा पत्ता लागला नाही.

आफताब शिवदासानीनेस पत्नी निन दुसांज हिच्याशी पारंपरिक पद्धतीने पुनर्विवाह केलाय.

अभिनेत्री इषा देओलने काही दिवसांपूर्वीच तिच्या बेबी शॉवर कार्यक्रमात पती भरत तख्तानी याच्याशी पुनर्विवाह केला. इषानंतर आता तिच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेता आफताब शिवदासानीनेसुद्धा पत्नी निन दुसांज हिच्याशी पारंपरिक पद्धतीने पुनर्विवाह केलाय.

वाचा : ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूसह तमन्ना भाटिया करणार लग्न?

श्रीलंकेतील अनंतारा पीस हेवन येथे हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नाला अगदी जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आल्याने कोणालाच आफताबच्या लग्नाचा पत्ता लागला नाही. त्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आफताब आणि निन यांनी ५ जून २०१४ रोजी त्यांच्या विवाहाची नोंदणी केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी रितीरिवाजानुसार लग्न केले नव्हते.

वाचा : शाहरुखने असे केले गणरायाचे विसर्जन

शाही सोहळ्यात हिंदू विवाहपद्धतीनुसार या दोघांनी लग्न केले. आफताब हत्तीवरून तर निन मेण्यातून लग्नमंडपापर्यंत पोहोचली. वर-वधूच्या पोशाखात हे जोडपे एखाद्या राजा-राणीप्रमाणे दिसत होते. लग्नाला दोघांचेही नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता.

हॉलिडेसाठी श्रीलंकेला गेलेल्या आफताब आणि निनला अनंतारा येथील निसर्गसौंदर्याने भुरळ पाडल्याने त्यांनी तेथेच लग्न करण्याचा विचार केला. या दोघांनाही आधीपासूनच डेस्टिशन वेडिंग करण्याची इच्छा होती. त्यामुळे अनंतारा हे ठिकाण त्यांना लग्नासाठी अगदी योग्य वाटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 11:02 am

Web Title: aftab shivdasani re ties knot with wife nin dusanj in a private wedding ceremony in sri lanka
Next Stories
1 ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूशी तमन्ना भाटिया करणार लग्न?
2 सेलिब्रिटी लेखक : करिअरचा श्रीगणेशा बाप्पानेच!
3 Ganesh Utsav 2017 PHOTO : शाहरुखने असे केले गणरायाचे विसर्जन
Just Now!
X