News Flash

२२ वर्षांनंतर सुरु होतेय चंद्रकांता मालिका; या अभिनेत्रीचा दिसणार बोल्ड लूक

९० च्या दशकातील प्रसिद्ध मालिकांमधील एक मालिका म्हणजे चंद्रकांता.

तब्बल २२ वर्षांनंतर चंद्रकांता ही मालिका आता पुन्हा नव्या रुपात सुरु होणार आहे.

टेलिव्हिजन म्हटलं की आपल्या तोंडावर पहिलं नाव येतं ते दूरदर्शन वाहिनीचं. आता आपल्याकडे मालिका पाहण्यासाठी १०० वाहिन्या असतील. पण ९० च्या दशकात दूरदर्शनवरच मालिका पाहिल्या जायच्या. आजही या मालिकांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात जशाच्या तशा असतील यात शंका नाही. ९० च्या दशकातील प्रसिद्ध मालिकांमधील एक मालिका म्हणजे चंद्रकांता.

तब्बल २२ वर्षांनंतर चंद्रकांता ही मालिका आता पुन्हा नव्या रुपात सुरु होणार आहे. दूरदर्शनवर चंद्रकांता मालिका १९९४ साली सुरु झाली होती. तब्बल तीन वर्ष दाखविण्यात आलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन सुनिल अग्निहोत्रीने केले होते. तर निरजा गुलेरी हिने मालिकेची निर्मिती केली होती. नव्या चंद्रकांता मालिकेची निर्मिती निखिल सिन्हा करणार आहे. नव्या अंदाजात सुरु होणा-या या मालिकेतील चंद्रकांताची भूमिका साकारणारी अभिनेत्रीही खूप ग्लॅमरस आहे. चंद्रकांता मालिकेत टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा हिची वर्णी लागली आहे. दुसरीकडे, टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिदेखील चंद्रकाता मालिका सुरु करणार आहे. मात्र, मालिकेतील चंद्रकाता मुख्य भूमिका साकारण्यासाठी तिला अद्याप अभिनेत्री मिळालेली नाही. निखिलची मालिका लाइफ ओके वाहिनीवर सुरु होणार असून एकताची मालिका कलर्स वाहिनीवर सुरु होणार आहे.

चंद्रकाता मालिकेसाठी निवड झाल्यानंतर कृतिका म्हणाली की, एकतासुद्धा याच विषयावर मालिका सुरु करणार असल्याचे माहित नव्हते. जेव्हा मी त्याचा टीझर पाहिला तेव्हा मला याबाबत कळले. एकताने मला अनेक मालिकांमध्ये काम दिले आहे. त्यामुळे मी सदर मालिका आणि एकता यांच्याकडे कोणत्याही स्पर्धेच्या रुपात बघत नाही. ही स्पर्धा माझ्यात आणि एकतामध्ये नसून मालिकेचे निर्माता आणि वाहिन्यांमध्ये असेल. मालिकेतील लूकसाठी कृतिका तिच्यावर बरीच मेहनत घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 2:47 pm

Web Title: after 22 years chandrakanta will be back on televison kritika kamra will play lead role
Next Stories
1 VIDEO: तरुणीची छेड काढणाऱ्या इसमाला आतिफ अस्लमने खडसावले
2 सनी म्हणतेय, ‘कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता’
3 ..अशा प्रकारे अभिषेकने घातली होती ऐश्वर्याला लग्नाची मागणी
Just Now!
X