News Flash

बेअर ग्रिल्सच्या थरारक शोमध्ये अजय देवगणसोबत ‘हा’ अभिनेता घेणार सहभाग

‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ डिस्कव्हरीवरील लोकप्रिय शो आहे.

ajay-devgan
Photo-Photo-Loksatta File Images

टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ (Into The Wild With Bear Grylls). या शो च्या प्रत्येक भागासाठी प्रेक्षक फार आतुरतेने वाट बघत असतात. डिस्कव्हरी चॅनेलवर हा शो सर्वाधिक पाहिला जाणाऱ्या  शो पैकी एक आहे. आतापर्यंत या शो मध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अजय देवगण या शोमध्ये झळाकणार असल्याची माहिती समोर आली होती. आता या यादीत आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचा समावेश होणार आहे.

अभिनेता अजय देवगण या शो चे शूटिंगसाठी मालदिवला रवाना झाला आहे. आता ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ फेम अभिनेता विकी कौशल या शोमध्ये झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता विकीचे चाहते खुप आतुरतेने या भागाची वाट बघत आहेत. ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ या, डिस्कव्हरी चॅनलवरील सुपर हिट शो मध्ये सेलिब्रेटी कठीण परिस्थिती कसे जगायचे हे या शो मध्ये पाहायला मिळतं. या शोच्या मागच्या सिझनमध्ये अभिनेता अक्षय कुमार, सुपर स्टार रजनीकांत आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीही २०१९ मध्ये या कार्यक्रमात दिसले होते. या शोचा नवीन सिझन तुम्ही डिस्कव्हरी प्लस अॅपवर होणार असल्याचे बोललं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकी कौशलच्या कामा बद्दल बोलायचे झाले तर ‘भूत-द हाऊनटेड शिप’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी प्रेक्षक त्याचे भरपूर कौतुक करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी विकिने ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ ला दोन वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्ताने ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामाची’ या आगामी चित्रपटाची एक झलक ट्वीट केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 1:49 pm

Web Title: after ajay devgan this actor all set to feature in into the wild with bear grylls after ajay devgn aad 97
Next Stories
1 ” ते माझा बलात्कार करतील अशी भीती होती”, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव
2 वरुणला किसिंग सीनसाठी किती गुण देशील?, आलिया म्हणते…
3 KBC 13: १२.५० लाखासाठी विचारलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला गेम, तुम्हाला देता येईल का या प्रश्नाचं उत्तर?
Just Now!
X