News Flash

‘राम सेतु’च्या सेटवर करोनाचा उद्रेक; अक्षय कुमारनंतर 45 जणांना करोनाची लागण

45 ज्युनिअर आर्टिस्टला करोनाची लागण

देशभरात करोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना बॉलिवूडमध्येही करोनाचं मोठं संकटं घोंगावताना दिसत आहे. रविवारी अभिनेता अक्षय कुमारने त्याला करोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती. अक्षय कुमार ‘राम सेतु’ सिनेमाचं शूटिंग करत होता. त्यानंतर आता ‘राम सेतु’च्या सेटवर 45 जणांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार 5 एप्रिलला शंभर जण ‘राम सेतु’च्या सेटवर आज कामाला सुरुवात करणार होते. मडमधील सेटवर हे सर्व ज्युनिअर आर्टिस्ट सिनेमाच्या शूटिंगच्या कामाला सुरुवात करणार होते. मात्र अक्षय कुमारला करोनाची लागण झाल्याने या सिनेमाचा भाग बनणाऱ्यांसाठी करोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. यात 100 जणांपैकी 45 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- करोनाची लागण झाल्यानंतर अक्षय कुमार रुग्णालयात दाखल, चाहत्यांना म्हणाला…

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंड‍िया सिने एंप्लॉइज (FWICE) चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, ” राम सेतु सिनेमाची संपूर्ण टीम सर्व प्रकारची खबरदारी बाळगत आहे. दूर्दैवाने ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या 45 लोकांना करोनाची लागण झाली आहे. ते सर्व क्वारंटाइन आहेत.”

आणखी वाचा- अभिनेता,दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव कोरना पॉझिटिव्ह; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

सिनेमाचं शूटिंग बंद

अक्षय कुमारसह 45 जणांना करोनाची लागण झाल्यानंतर 5 एप्रिलपासून मुंबईत सुरु होणारं ‘राम सेतु’ सिनेमाची शूटिंग बंद करण्यात आलं आहे. जवळपास 15 दिवस शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. अक्षय कुमारला करोनाची लागण होण्यापूर्वी तो राम सेतुचं शूटिंग करत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 9:02 am

Web Title: after akshay kumar 45 junior artist tested positive on ram setu set kpw 89
Next Stories
1 अखेर कपिल शर्माने बाळचं नाव सांगितलं; मुलाचं नाव आहे…
2 “तो क्षण मी कधीच विसरणार नाही..”, तारक मेहता मधील दया बेनने सांगितली पहिल्या पगाराची कहानी
3 “म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला..”, अभिषेकने सांगितले ऐश्वर्याशी लग्न करण्याचे कारण
Just Now!
X