बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने काही करावे आणि त्याची बातमी होऊ नये, असं होऊच शकत नाही. तिच्या प्रत्येक हालचालींवर प्रसारमाध्यमांच बारीक लक्ष असतं. ती काय करते, कुठे जाते, एवढेच काय तर तिने तिचा मॅनेजर बदलला तरी त्याची बातमी होते. तुम्हाला खरं वाटत नाहीये ना? मग पुढची बातमी वाचून तुम्हाला आमचं म्हणणं पटेल.

आवाज ऐकूनच अबू सालेमच्या प्रेमात पडले: मोनिका बेदी

सध्या प्रियांका हॉलिवूडमधील अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असून, तिच्याकडे एवढे काम आहे की, तिला बॉलिवूडचे नवीन प्रोजेक्ट हाती घेता येत नाहीयेत. कामाचा व्याप एकटीने सांभळणं तिला कठीण झाल्यामुळेच तिने नव्या मॅनेजरची नियुक्ती केली आहे. ‘बॉलिवूडलाइफ’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने रेश्मा शेट्टीची मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. आता रेश्माच प्रियांकाची सर्व व्यावसायिक कामं सांभाळणार आहे. रेश्मा पूर्वी अभिनेता सलमान खानकडे मॅनेजर म्हणून कामाला होती.

प्रियांकाने साहिर लुधियानवी यांच्या आयुष्यावरील संजय लीला भन्साळींच्या ‘गुस्ताखियाँ’ या आगामी सिनेमाच्या करारावर स्वाक्षरी केली असून, सिनेमात शाहरुख खान आणि प्रियांकाची मुख्य भूमिका असल्याची चर्चा होती. परंतु शाहरुख आणि प्रियांकाने याचे खंडन केले आहे. प्रियांका आमिर खानसोबत राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात होते. नंतर, या सिनेमात फातिमा सना शेख काम करणार असल्याचे पुढे आले.

रेश्मा शेट्टीविषयी सांगायचे झाल्यास, सलमानची एक्स मॅनेजर अशी तिची ओळख आहे. सलमान नावाचा ब्रॅण्ड जगासमोर उभा करण्यात तिचा सर्वात मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. सलमानवर अनेक गुन्हे दाखल असूनसुध्दा त्याची प्रतीमा लोकांसमोर कशी चांगली राहिल याची योग्य काळजी तिने घेतली. सलमान आणि तिच्यात काही कारणांमुळे वाद झाल्यानंतर सलमानने तिला बाहेरचा रस्ता दाखवला. रेश्मा सलमानच्या चमूतून बाहेर पडल्याचे कळताच अक्षय कुमारने तिची मॅनेजर म्हणून निवड केली.

आपली कामे स्वत:चं करणाऱ्या अक्षयने बऱ्याच वर्षांपर्यंत मॅनेजरची नियुक्ती केली नव्हती. रेश्माच्या कंपनीने अक्षय कुमारसोबतच सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि करण जोहर यांच्या कामांची जबाबदारी स्वीकारली. आता तिच्या या कलाकारांच्या यादीत प्रियांका चोप्राच्या नावाचाही सहभाग झाला आहे.