News Flash

धर्मेंद्र यांच्या घरावर करोनाचं संकट!, तीन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

कर्मचाऱ्यांना क्वॉरंटीन करण्यात आलंय

राज्यासह देशात करोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलं आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतेय. एकीकडे लसीकरण सुरु करण्यात आलं असलं तरी करोनाचा धोका वाढत असल्यानं नागरिकांनी पुन्हा एकदा सर्व नियमांचं पालन करावं अशा सुचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

बॉलिवूडमध्ये देखील करोनाच्या संकटामुळे चिंता वाढू लागली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि आमिर खानला करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींमध्ये चिंता वाढू लागली आहे. त्यातच अभिनेते धर्मेंद यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीन जणांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त आलं आहे.

अभिनेते धर्मेंद यांच्या स्टाफमधील तिघांची करोना चाचणी पॉझेटिव्ह आली आहे. या कर्मचाऱ्यांना क्वॉरंटीन करण्यात आलंय. तसंच ते डॉक्टरांकडून पूर्ण काळजी घेतली जात असल्याचं सांगण्यातं आलं आहे. तसचं धर्मेंद यांचं पूर्ण कुटुंब सर्व प्रकारची काळजी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

धर्मेंद गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लोणावळ्यातील फार्म हाउसवर राहत होते. मात्र आता ते मुंबईमध्ये परतले आहेत. तसचं नुकतीच धर्मेंद यांनी करोनावरील प्रतिबंधात्मक लस घेतल्याचंही सांगितलं आहे. “मी करोनाची लस घेतली आहे. शिवाय पुन्हा करोनाची चाचणी केली आहे. मी पूर्णपणे ठिक आहे.” असं त्यांनी सांगितलं. यावेळी लस घेण्याचं आणि सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे.

धर्मेंद सोशल मीडिया चांगलेच सक्रिय असतात. अनेकदा त्यांनी शेतात कर्मचाऱ्यासोबत काम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:13 pm

Web Title: after amir khan kartik aaryan bollywood actor dharmendra 3 staff member tested positive kpw 89
Next Stories
1 अमृताच्या पार्टीला करण जोहर आणि मलायका-अर्जुनची हजेरी, फोटो व्हायरल
2 “जीना इसी का नाम है”; जन्मदिनानिमित्ताने फारुख शेख यांच्याबद्दल खास गोष्टी
3 सुझान खानच्या ‘त्या’ पोस्टवर हृतिकची कमेंट, म्हणाला…
Just Now!
X