News Flash

अनिता-रोहितनंतर हे कपल देणार लवकरच गूडन्यूज

जाणून घ्या कोण आहे हे लोकप्रिय कपल

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. आता त्यांच्या पाठोपाठ आणखी कपलने सोशल मीडिया पोस्टद्वारे गूडन्यूज दिली आहे. हे कपल दुसरं तिसरं कोणी नसून अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि तिचा पती अभिनेता सुयश आहे. किश्वर आणि सुयशने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज दिली.

सुयश आणि किश्वर दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही समुद्र किनाऱ्यावर आहेत. त्यांच्या समोर ऑगस्ट २०२१ लिहलेले दिसत असून तिथे लहान बाळाचे शूज दिसत आहेत. याचा अर्थ ऑगस्टमध्ये किश्वर तिच्या बाळाला जन्म देणार आहे.

“आम्हाला बाळ कधी होणार हा प्रश्न विचारणं तुम्ही आता थांबवू शकता. लवकरच…#august2021 #sukishkababy” असं हॅशटॅग देत तिने ऑगस्टमध्ये बाळाला जन्म देणार असल्याचं सांगितलंय.सुयश आणि किश्वरला त्यांचे जवळचे मित्र आणि चाहते सुकिश म्हणून हाक मारतात म्हणून किश्वरने सुकिश हे हॅशटॅग वापरले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

सुयश फोटो शेअर करत म्हणाला, “मी बाप होणार आहे, ऑगस्टची प्रतिक्षा” एवढंच नव्हे तर सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बाबा’ हे नाव ठेवलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by “baबाँ“ (@suyyashrai)

या आधी किश्वरने या सगळ्याची तयारी करत असतानाचा BTS फोटो शेअर केला होता. सुयश आणि किश्वरचीची जवळची मैत्रीण प्रियांका हिने त्यांना या खास फोटोच्या तयारीसाठी मदत केलीये. याचवेळी तिने आणखी एक फोटो शेअर केलाय. “तुला पाहण्याची प्रतिक्षा करू शकत नाही.” यात ती तिच्या बाळा विषयी बोलत आहे. ही बातमी कळताच त्यांच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

२०१० मध्ये ‘प्यार की एक कहानी’ या मालिके दरम्यान किश्वर आणि सुयशची भेट झाली होती. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. तर २०१६ मध्ये सुयश-किश्वरने लग्नगाठ बांधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 1:18 pm

Web Title: after anita and rohit this couple is going to give birth to their first child dcp 98
Next Stories
1 अनुराग कश्यप, तापसी पन्नूविरोधात आयकरची छापेमारी; मुंबईतील मालमत्तांची झाडाझडती
2 ‘मालिका ही एका कलाकाराची नाही’, दयाबेनच्या वापसीवर अंजली भाभी म्हणाली
3 अनुष्काने शेअर केला खास फोटो, वामिकासोबत अनुष्का पोहचली ‘या’ ठिकाणी
Just Now!
X