News Flash

२०१८ मध्ये मिलिंद सोमण करणार लग्न?

काही दिवसांपूर्वी मिलिंद अंकिताच्या कुटुंबियांना भेटला होता

मिलिंद सोमण

मिलिंद सोमण याचा फिटनेस आणि त्याच्या लूकचे अनेकजण चाहते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मिलिंद त्याच्या पिंकथॉनसाठी जेवढा चर्चेत येत आहे तेवढाच त्याची प्रेयसी अंकिता कोनवारमुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. असे म्हटले जाते की, पुढच्या वर्षी ५२ वर्षीय मिलिंद आणि २६ वर्षीय अंकिता लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या आहेत. याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता आणि मिलिंदमधील वयाचा फरक लक्षात घेता अंकिताच्या कुटुंबियांकडून या नात्याला विरोध केला जात होता. म्हणून काही दिवसांपूर्वी मिलिंद अंकिताच्या कुटुंबियांना भेटला होता. त्यांच्याशी बोलल्यानंतर अंकिताच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला हिरवा कंदील दिला.

https://www.instagram.com/milindrunning/

सोशल मीडियावर त्यांच्या नात्यांबद्दल फारशा सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत नाही. मात्र, तरीही मिलिंद त्यांच्या नात्याबद्दल ठाम आहे. मिलिंदच्या प्रेयसीचे खरे नाव अंकिता नसून संकुस्मिता कोनवार आहे. संकुस्मिता २०१३ पासून एका एअरलाइनमध्ये ‘केबिन क्रू’ म्हणून काम करते आहे. मिलिंदने अलिशा चिनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

https://www.instagram.com/milindrunning/

मिलिंद सोमण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. लोकांच्या मतांची फारशी पर्वा न करता तो अनेकदा अंकितासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अंकिता आणि तो सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. प्रेमाला वयाची मर्यादा नसते, अशा मतावर ठाम असणाऱ्या मिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. तीन वर्षाच्या संसारानंतर त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मिलिंद कलाविश्वात सक्रिय आहेच. पण, त्यासोबतच त्याच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 3:59 pm

Web Title: after anushka sharma virat kohli milind soman to marry girlfriend ankita konwar
Next Stories
1 सलमानची आणखी एक तथाकथित प्रेयसी क्रिकेटरशी वाढवतेय जवळीक
2 ‘विरुष्का’चा हनिमून लाहोर आणि कराचीमध्ये; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
3 VIDEO : खिलाडी कुमार म्हणतोय, ‘पाहायला विसरु नका…. देवा’
Just Now!
X