News Flash

आशुतोष राणानंतर पत्नी रेणुका शहाणे आणि मुलेही करोना पॉझिटिव्ह

संपूर्ण कुटुंब हे होम क्वारंटाईन आहे...

(Photo credit : Renuka Shahane instagram)

राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेता आशुतोष राणाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तर आता आशुतोष राणाच्या संपूर्ण कुटूंबाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी म्हणजेच १७ एप्रिल रोजी आशुतोष राणा यांची पत्नी रेणूका शहाणे आणि त्यांची मुलं शौर्यमान आणि सत्येंद्र या सगळ्यांची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे घरीच आयसोलेशनमध्ये राहत आहेत. या आधी आशुतोष राणाने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. आशुतोष राणा आणि रेणूका शहाणे या दोघांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी आशुतोष आणि रेणूका या दोघांनीही करोनाची पहिली लस घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Renuka Shahane (@renukash710)

दरम्यान, शनिवारी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यात अर्जुन रामपाल, नील नितीन मुकेश, सोनू सूद आणि मनिष मल्होत्राची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती. या आधी आलीया भट्ट, रणबीर कपूर, अक्षय कुमार, गोविंदा आणि कार्तिक आर्यन यांची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 5:56 pm

Web Title: after ashutosh rana wife renuka shahane and their children s test positive for coronavirus dcp 98
Next Stories
1 तैमूर आहे १००० चौरस फूट बागेचा मालक
2 केएल राहुलच्या वाढदिवशी अथिया शेट्टीची ‘खास’ पोस्ट व्हायरल
3 छोट्या पडद्यावरचा ‘हा’ कलाकार लवकरच दिसणार आलिया भटसोबत!
Just Now!
X