News Flash

अज्ञात व्यक्तीच्या ‘त्या’ कृत्याने दिशा पटानीला बसला धक्का!

त्यामुळे ती आता अंगरक्षकसोबत ठेवण्याचा विचार करत आहे.

दिशा पटानी,disha patni
अभिनेत्री दिशा पटानी

‘बेगम जान’ चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या विद्या बालनसोबत झालेल्या गैरवर्तणुकीच्या घटनेनंतर आता बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीला चाहत्याने त्रास दिल्याचे समोर आले आहे. एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी दिल्लीमध्ये गेलेल्या दिशा पटानीला एका अज्ञात व्यक्तीने पाठलाग करुन त्रास दिल्याची घटना घडली. चित्रीकरणाच्या ठिकाणापासून मॉलपर्यंत आणि मॉलपासून ते दिशा ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होती, त्या हॉटेलपर्यंत या अज्ञात व्यक्तीने दिशाला भेटण्यासाठी पाठलाग केला. मॉल आणि चित्रीकरणाच्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती पाठलाग करत असल्याचे दिशाच्या लक्षात आले होते. मात्र, ही व्यक्ती पाठलाग करत चक्क हॉटेलपर्यंत आल्याचे जेव्हा दिशाला कळले, तेव्हा तिला धक्काच बसला.

दिशाला भेटण्यासाठी आलेल्या या व्यक्तीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळूनच हाकलून लावले. दिशाला भेटू दिल्याने या व्यक्तीने या कर्मचाऱ्यांशी वाद देखील घातल्याचे समजते. या घटनेनंतर दिशाने कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही, मात्र पुन्हा अशा प्रकारे त्रास होऊ नये, यासाठी ती आता अंगरक्षकसोबत ठेवण्याचा विचार करत आहे. बॉलिवूड कलाकारांसोबत असा प्रकार होणे नवीन नाही. यापूर्वी अभिनेत्री श्रुती हसनला अशा प्रकारास सामोरे जावे लागले होते.  काही दिवसांपूर्वीच कोलकातामध्ये विद्या सोबत एका चाहत्याने गैरवर्तन केले होते. ‘बेगम जान’ चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी चाहत्याला सेल्फी देण्यासाठी विद्याने तयारी दाखविल्यानंतर त्या व्यक्तीने विद्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विद्याने त्याला बाजूला ढकलत चांगलेच सुनावले होते.

दिशा पटानीविषयी बोलायचे तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने लक्षवेधी भूमिका साकारली होती. सध्या दिशा पटानी करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 10:26 pm

Web Title: after begum jaan actress vidya balan disha patani was stalked by male fan
Next Stories
1 सोनी म्युझिकने सलमानच्या तीन गाण्यांसाठी मोजले २० कोटी
2 … म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारले
3 Meri Pyaari Bindu : परिणीतीच्या आवाजातील ‘माना के हम यार नही’ गाणे प्रदर्शित
Just Now!
X