07 August 2020

News Flash

‘सर तुमचा आम्ही आदर करतो, पण सोनाक्षी…’, ट्रोलर्सची अजयला विनंती

'भूज' चित्रपटाच्या पोस्टरमुळे सोनाक्षीला ट्रोल करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अजय देवगणसोबत संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी पोस्टरपाहून सोनाक्षीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका ट्रोलरने तर सोनाक्षीला चित्रपट काढून टाकण्याची मागणी अजयकडे केली आहे.

‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा सुंदरबेन जेठा मधारपर्या यांची भूमिका साकारणार आहे. सोनाक्षी एकदम वेगळ्या अंदाजात या चित्रपटात दिसणार आहे. अजय देवगणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटातील सोनाक्षीचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. आता नेटकऱ्यांनी सोनाक्षीचा लूक पाहून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘सर आम्ही मनापासून तुमचा आदर करतो. पण सोनाक्षीचा नाही. तिला अभिनय येत नाही. आम्हाला ती आवडतही नाही. कृपया तिला या चित्रपटातून काढून टाका. सर, आमचे तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे’ असे एका ट्रोलरने म्हटले आहे.

अजय देवगणने या चित्रपटात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका साकारली आहे. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावर हा चित्रपट आधारीत आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एका गावातील ३०० महिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारताला युद्धात विजय मिळवून देण्यासाठी या महिलांनी दिलेले योगदान कथेतून मांडण्यात आले आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी डिझनी हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 4:55 pm

Web Title: after bhuj movie poster release sonakshi sinha get troll again avb 95
Next Stories
1 ६५ वर्षांच्या कलाकारांना शूटिंग करण्यास मनाई; सरकारविरोधात जॅकी श्रॉफ यांनी उठवला आवाज
2 करीनाने प्रियांकाला दिल्या ‘बर्थ डे’ च्या हटके शुभेच्छा, शेअर केला खास फोटो
3 ‘स्वामिनी’ मालिकेमध्ये मोठ्या रमेच्या पावलांनी उजळणार शनिवारवाडा !
Just Now!
X