बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, आई पूनम सिन्हा आणि भाऊ लव्ह सिन्हा हे राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आता सोनाक्षी बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून काम करता करता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणाकडे वळणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये सोनाक्षीला या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. तिने यावर उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने राजकारणात एण्ट्री करणार की नाही यावर वक्तव्य केले आहे. “माझा असा काही प्लॅन नाही” असे सोनाक्षी म्हणाली. तर भाऊ लव्ह सिन्हाच्या राजकारणातील एण्ट्रीबद्दल सोनाक्षी म्हणाली, “मी खूप आनंदी आहे की लव्हने हे पाऊल उचलले आहे. राजकारणात काय सुरु आहे याची माहिती त्याला असते.’

दरम्यान, सोनाक्षी सलमान खानसोबत दबंग ३ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले होते. तर ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा सोनाक्षी सिन्हाचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगन आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शरद केळकर, एम्मी विर्क आणि प्रनिता सुभाष या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.