News Flash

करणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्याला डेट करते अनुषा दांडेकर

जाणून घ्या कोण आहे हा अभिनेता

वीजे आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरचे लाखो चाहते आहेत. अनुषा अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. गेल्या वर्षी करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरच्या ब्रेकअपच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अनुषा आता छोट्यापडद्यावरील एका अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘झांसी की राणी’ या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता जेसन आणि अनुषा रिलेशनशिपमध्ये आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, जेसनने या बातमीला दुजोरा दिला आहे. हे दोघे एका म्युझिक व्हिडीओच्या सेटवर भेटले होते. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. “ती माझ्या जीवनात आल्यापासून माझे जीवन सुंदर झाले आहे. कारण ती वर्तमानात जगण्यात विश्वास ठेवते,”असे जेसन म्हणाला. त्या दोघांनी अजुन लग्नाचा विचार केलेला नाही, मात्र त्या दोघांमधील प्रेम हे त्यांच्या चाहत्यांना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

१७ मार्च रोजी अनुषाने सोशल मीडियावर जेसन सोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अनुषासोबत जेसन दिसत आहे. जेसन शर्टसेल उभा आहे. “जेव्हा आपला दिग्दर्शक असा दिसतो तेव्हा…हॅलो जेसन” अशा आशयाचे कॅप्शन अनुषाने दिले आहे. या दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे. जेसन अनुषाची बहिण शिबानी दांडेकरला देखील ओळखतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jason Shah (@jasonshah)

दरम्यान, अनुषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत करण कुंद्राने तिला फसवल्याचं म्हंटलं आहे. नुकतच अनुषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत संवाद साधला. या “आस्क मी एनी थिंग” सेशनमध्ये तिने ब्रेकअपबद्दल सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 6:25 pm

Web Title: after breaking up with karan kkundra anusha dandekar is dating this actor dcp 98
Next Stories
1 नवी वाहिनी “झी चित्रमंदिर” येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 कबीर बेदी यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर; आत्मचरित्र उलगडणार त्यांचं आयुष्य
3 “तीन वेळा पाहिला, आज चौथ्यांदा पाहणार”- अमिताभ बच्चन
Just Now!
X