बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक काही दिवसांपुर्वी प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यापैकी एक म्हणजे मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर प्रियांकाला दोन चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

प्रियांकाने २०००मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने ४ चित्रपट साईन केले होते. मात्र चुकीच्या फेस सर्जरीमुळे तिला दोन चित्रपटांतून काढून टाकण्यात आले होते. त्यातला एक चित्रपट हा दाक्षिणात्य चित्रपट होता. या चित्रपटाचे नाव ‘Thamizhan असे असून या चित्रपटात दक्षिणात्य सुपरस्टार विजय मुख्य भूमिकेत होता.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका तिच्या पुस्तकात म्हणाली की, चेहऱ्याची सर्जरी झाल्यानंतर माझा चेहरा थोडा विचित्र दिसत होता. तरी सुद्धा ‘Thamizhan’च्या संपुर्ण टीमने तिची साथ दिली ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. चित्रपटाच्या सेटवर प्रियांकाच्या दिसण्यावर कधीच चर्चा झाली नाही. प्रियांकासाठी तामिळ भाषा नवीन होती, परंतू एका तामिळ प्रशिक्षकाने तिला खूप मदत केली होती.

पुढे प्रियांकाने तिचा पहिला सहकलाकार विजय बद्दल लिहले आहे. विजय खूप हुशार अभिनेता आहे. विजय त्यावेळीच लोकप्रिय अभिनेता होता. दररोज शुटिंगच्या जागेवर विजयचे लाखो चाहते यायचे जेणे करून त्यांना विजयची एक झलक पाहायला मिळेल. चाहते विजयचे १५ तासांचे शूटिंग पूर्ण होई पर्यंत वाट पाहायचे. शूटींग संपल्यानंतर विजय त्यांच्याशी जाऊन बोलायचा, त्यांचा आदर करायचा आणि सगळ्यांसोबत १ ते दीड तास फोटो काढायचा असे तिने म्हटले आहे.

पुढे प्रियांका म्हणाली की,” विजयचे चाहत्यांसोबत विनम्रपणे राहणे आणि त्यांचा आदर करणे याचा माझ्यावर प्रभाव पडला होता. ‘Thamizhan’ या चित्रपटाच्या १४ ते १५ वर्षांनंतर जेव्हा मी ‘क्वांटिको’ या इंटरनॅशनल वेब सीरिजचे चित्रकरण न्युयॉर्क पब्लिक लायब्ररी समोर करत होती तेव्हा माझे अनेक चाहते शूटिंग पाहण्यासाठी तेथे आले होते. दुपारी जेवणाचा ब्रेक मिळाला की मी त्या चाहत्यांसोबत जाऊन बोलायची आणि फोटो काढायची. त्यावेळी मला माझा पहिलावहिला सहकलाकार विजयची आठवण आली आणि मी विजय सारखे केले.”

‘Thamizhan’ हा तामिळ अॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मजीठ यांनी केले आहे. तर विजयने यात एका वकिलाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १४ एप्रिल २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या पुस्तकातील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. प्रियांकाचे हे पुस्तक बेस्ट सेलर बूक ठरलेलं आहे.