News Flash

‘दगडी चाळ’नंतर येतोय ‘दगडाबाईची चाळ’!

अडचणींवर दगडाबाई मात करते की नाही ? हे चित्रपटात पाहावयास मिळेल.

अभिनेत्री विशाखा सुभेदार या चित्रपटात दगडाबाई ही प्रमुख भूमिका साकारत आहेत.

नुकताचं ‘दगडी चाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा चित्रपट अजूनही तिकीटबारीवर आपली कमाल दाखवतोय. त्यानंतर आता ‘दगडाबाईची चाळ’ हा चित्रपट येऊ घातलायं. मात्र, हा एक विनोदी चित्रपट असेल.
परळ येथील एका चाळीची मालकीण असलेली दगडाबाई आणि त्या चाळीतील भाडोत्री यांच्यावर बेतलेला हा चित्रपट असून चाळीतले नातेसंबंध दाखविण्याचाही प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रत्येक दिवसाच्या विनोदाबरोबरच दगडाबाईच्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंग, आर्थिक अडचणी आणि त्यावर दगडबाई कशा पद्धतीने मात करते  त्याचबरोबर अचानक दगडाबाईच्या दोन पुतण्या गायब झाल्याने तिच्या अडचणीत अधिकच भर पडते. या अडचणींवर दगडाबाई कशी मात करते की नाही ? हे चित्रपटात पाहावयास मिळेल.
आपल्या दमदार विनोदी अभिनयाद्वारे लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार या चित्रपटात दगडाबाई ही प्रमुख भूमिका साकारत आहेत. विशाखासह भूषण कडू, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर, जॉनी रावत, किशोर चौघुले, सुनील गोडबोले यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 2:47 pm

Web Title: after dagadi chawl now its dagdabaichi chawl
Next Stories
1 अबरामच्या ‘शूज’चे अनोखे कलेक्शन
2 स्पृहा जोशी बनणार ‘किचनची सुपरस्टार….’
3 एक बोट ‘युजलेस’ असल्याचा आलियाला साक्षात्कार!
Just Now!
X