News Flash

निधनाच्या अफवेनंतर मिनाक्षी शेषाद्री फोटो शेअर करत म्हणाल्या….

पाहा मिनाक्षी आता कशा दिसतात..

अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांनी ९०च्या दशकात बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर त्यांनी जादू केली होती. पण करिअर यशाच्या शिखरावर असताना त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. आता सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र स्वत: मिनाक्षी यांनी फोटो शेअर करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री मिनाक्षी यांचे करोनामुळे निधन झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या पाहून मिनाक्षी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या गार्डनमध्ये बसल्याचे दिसत आहे. दरम्यान त्यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘डान्स पोज’ असे कॅप्शन दिले आहे.

पाहा : बॉलिवूडची ‘दामिनी’ मिनाक्षी शेषाद्री राहत असलेले अमेरिकेतील आलिशान घर पाहिलेत का?

सध्या मिनाक्षी या अमेरिकेतील टेक्सास शहरात राहतात. तेथे त्या पती हरीश मैसूर आणि दोन मुलांसोबत राहतात. मिनाक्षी यांनी १९८३ साली निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा तेव्हाचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. या सिनेमामुळे मिनाक्षी या एका रात्रीत स्टार झाल्या होत्या. त्यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत ‘दामिनी’ चित्रपटात काम केले होते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना विशेष पसंतीला उतरली होती. मिनाक्षी यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, आणि विनोद खन्ना अशा सुपरस्टार्ससोबत अनेक चित्रपटात काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 10:56 am

Web Title: after death rumor damini actress meenakshi seshadri shares stunning pic avb 95
Next Stories
1 मिलिंद सोमणचा ‘नो फोन डे’; “मग व्हिडीओ कसा शूट केला?” चाहत्यांचा प्रश्न
2 नेटकऱ्यांनी मावशीसाठी बेड मिळवून देण्यास केली मदत, भूमी पेडणेकरने मानले आभार
3 “ते निर्माते कलाकारांना आपल्या तालावर नाचवत आहेत”; रवीना टंडनचा खुलासा
Just Now!
X