News Flash

अंकिता लोखंडेचा विना मेकअप फोटो व्हायरल

हा फोटो सध्या चर्चेत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अंकिता बऱ्याच वेळा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकताच अंकिताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अंकिताचा व्हायरल झालेला फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंकिता विना मेकअप दिसत आहे. हा फोटो शेअर करत अंकिताने छान असे कॅप्शन दिले आहे. “नो मेकअप आणि नो हेअरस्टाइल” अशा आशयाचं कॅप्शन अंकिताने दिले आहे. अंकिताचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या फोटोमध्ये अंकिताने शॉर्ट प्रिंटेड ड्रेस परिधान केला असून ती या लूकमध्ये सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

दरम्यान, अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. याच मालिकेतून ती घरा घरात पोहोचली होती. अंकिताने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अंकिताने कंगणा रनौतच्या ‘मनिकर्णिका’ आणि टायगरच्या ‘बाघी ३’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 4:21 pm

Web Title: after first kiss video ankita lokhandes pic went viral dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘गोवा शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ‘पुनरागमनाय च’आणि ‘आशेची रोषणाई’ची बाजी; पटकावले ‘हे’ पुरस्कार
2 “शेतकरी तुला दहशतवादी वाटतात का?”; कंगनाच्या ट्विटवर दिलजीतनं दिलं जोरदार प्रत्युत्तर
3 सैफ अली खानच्या ‘तांडव’ सीरिजचा टीझर प्रदर्शित
Just Now!
X