08 December 2019

News Flash

कार्तिक म्हणतो, सैफची ती अट पूर्ण केल्यावरच साराला डेटवर नेइन

सारानं कार्तिकसोबत डेटवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सारा अली खाननं अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र या गोष्टीला काही महिने उलटले पण कार्तिक काही साराला घेऊन डेटवर गेला नाही. विशेष म्हणजे जोपर्यंत साराचे वडील सैफ अली खाननं ठेवलेली अट पूर्ण करत नाही तोपर्यंत साराला डेटवर नेणार नाही असा पण कार्तिकनं केला आहे.

ज्या मुलाची आर्थिक बाजू भक्कम असेल आणि बँक खात्यात पुरेसे पैसे असतील त्यानं साराला डेटवर न्यावं अशी अट सैफनं ठेवली होती. या अटीचा विचार करून आपण आतापर्यंत थांबलो आहे असं कार्तिक मिश्किलपणे म्हणाला. ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात करणनं त्याला साराला डेटवर कधी नेणार यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर ‘सैफच्या अटीप्रमाणे तयारीला लागलो आहे, जोपर्यंत बँक खात्यात मोठी रक्कम जमा होत नाही तोपर्यंत साराला डेटवर नेणार नाही’ असं कार्तिक म्हणाला.

एकीकडे सारा आणि कार्तिकचं सूत जुळवण्याचा प्रयत्न करणनं केला असला तरी दुसरीकडे कार्तिक अनन्या पांड्येला डेट करत असल्याच्या चर्चाही आहे. मात्र आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं सांगत कार्तिकनं अनन्यासोबतच्या लिंकअपच्या चर्चा उडवून लावल्या.

First Published on February 11, 2019 11:22 am

Web Title: after fulfilling saif ali khan condition then only i will date sara ali khan kartik aaryan reveals
Just Now!
X