30 November 2020

News Flash

मलायकाने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, रिकामी बाटली द्या अन्…

पाहा, मलायकाने शेअर केलेला व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम तिचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असते.त्यामुळे अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र, यावेळी मलायकाने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष या व्हिडीओमध्ये तिला रिकाम्या बाटलीच्या बदल्यात एक खास गिफ्ट मिळाल्याचं तिने सांगितलं आहे.

मलायकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती जॉनी वॉकर या मद्याचा ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. यात मलायका जॉनी वॉकरची रिकामी बाटली घेऊन बारमध्ये जाते आणि त्याच्या बदल्यात तिला एक आकर्षक गिफ्ट मिळतं असं दाखवण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

ज्यावेळी बारमध्ये जाल त्यावेळी जॉनी वॉकरची रिकामी बाटली घेऊन जा. त्या रिकाम्या बाटलीच्या बदल्यात तुम्हाला नक्कीच एक सुंदर व आकर्षक भेटवस्तू मिळेल. देशातील ग्लास आर्टिस्ट बाटलीच्या काचेपासून एक सुंदर शिल्पाकृती तयार करतील, असं कॅप्शन मलायकाने या व्हिडीओला दिलं आहे.

आणखी वाचा- अर्जुन कपूरने शेअर केला मलायकाचा ‘हा’ खास फोटो; म्हणाला…

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चिला जात असून त्याला ७८ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. मलायका सध्या’इंडियाज बेस्ट डान्सर’ या डान्यच्या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 10:20 am

Web Title: after giving an empty bottle malaika got a gift dcp98
Next Stories
1 “हे तर आरक्षणाचे दुष्परिणाम, जेव्हा योग्यता नसलेली व्यक्ती…”; कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य
2 अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडची पुन्हा होणार चौकशी?
3 ‘या’ कारणामुळे बिग बींना वाटते ATM कार्ड वापरण्याची भीती
Just Now!
X