22 October 2019

News Flash

हार्दिक, लोकेशवर कारवाई मग रणवीरवर का नाही?, नेटकऱ्यांचा सवाल

करिनाबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या रणवीरचा कॉफी विथ करणमधला व्हिडिओ व्हायरल

‘कॉफी विथ करण’मध्ये महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांचा वाद ताजा असतानाच आता अभिनेता रणवीर सिंगही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘कॉफी विथ करण’मध्ये काही वर्षांपूर्वी अनुष्कासोबत उपस्थिती लावलेल्या रणवीरनंही महिलांवर आक्षेपार्ह टीपण्णी केली . जर हार्दिक आणि लोकेशवर कारवाई होते मग रणवीरवर का नाही असा सवाल अनेकांनी ट्विटमधून विचारला आहे.

या कार्यक्रमात रणवीरनं अभिनेत्री करिनाविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य केलं होतं. गप्पागोष्टीदरम्यान रणवीरनं स्विमिंगसाठी क्लबमध्ये येणाऱ्या करिनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याच्या करिनाबद्दलच्या भावना ऐकून या चर्चेदरम्यान ‘करीना माझ्यासाठी बहिणीसारखी असून तुझ्या बोलण्यानं मी देखील दुखावला जाऊ शकतो’, असं सांगत करणनं त्याला मध्ये थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र करणनंही हा विषय थट्टा मस्करीत पुढे नेला.

हा व्हिडिओ जरी जुना असला तरी अनेकांनी या व्हिडिओती आक्षेपार्ह टीप्पणीमुळे रणवीर आणि करणला धारेवर धरलं आहे. आजच्या घडीचा आघाडीचा दिग्दर्शक आणि अभिनेता या दोघांची महिलांप्रती असलेले विचार हे मर्यादा ओलांडणारे आहे अशा शब्दात अनेकांनी रणवीर आणि करणला खडे बोल सुनावले आहे.

First Published on January 11, 2019 6:41 pm

Web Title: after hardik pandya internet digs up ranveer singh old video koffee with karan