20 November 2019

News Flash

कोमोलिकानंतर प्रेरणासुद्धा सोडणार ‘कसौटी जिंदगी की’?

प्रेरणाच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार?

एरिका फर्नांडिस

भारतीय प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी एकता कपूरची ‘कसौटी जिंदगी की’ ही प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्यावर परत आली. नव्या रुपातील, नव्या ढंगातील या मालिकेनेही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पार्थ समथान, एरिका फर्नांडिस आणि हिना खान यांची मुख्य भूमिका या मालिकेत आहे. पण काही दिवसांपूर्वीच कोमोलिकाची भूमिका साकारणाऱ्या हिनाने ही मालिका सोडली. त्यानंतर आता प्रेरणाची भूमिका साकारणारी इरिका फर्नांडिससुद्धा मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, एरिका लवकरच मालिकेचा निरोप घेणार आहे. पण यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एरिकाच्या निरोपाला न्याय देण्यासाठी त्यानुसार मालिकेची पुढची कथा लिहिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे एकता कपूरने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निर्मात्यांकडून याबाबतची अधिकृत घोषणा कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

एरिकाने ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. मागच्या वर्षी सुरू झालेल्या ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील पार्थसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागली होती. इतकंच नव्हे तर खऱ्या आयुष्यात पार्थ आणि एरिका डेट करत असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे एरिकाच्या जाण्याचा फटका मालिकेला बसणार हे निश्चित. त्याचसोबत प्रेरणाच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on May 18, 2019 5:51 pm

Web Title: after hina khan erica fernandes to quit kasautii zindagii kay reports
Just Now!
X