News Flash

‘झिम्मा’च्या ‘त्या’ बोल्डसीनमुळे सायली संजीव चर्चेत

पाहा व्हिडीओ

‘झिम्मा’ या चित्रपटाचा टीझर मुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘जागतिक महिला दिना’निमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. टीझरने प्रत्येकाची मने जिंकली आहेत. मात्र, चित्रपटाच्या टीझर पेक्षा जास्त चर्चा ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील सायली संजीवच्या बोल्ड सीनची रंगली आहे.

मराठी मालिकांमध्ये सूनेच्या भूमिकेत दिसणाऱ्या सायलीने चित्रपटांमध्ये मात्र थोडी हटके भूमिका साकरण्यावर भर दिला आहे. सायलीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रत्येक चित्रपटात सायलीला वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळालं आहे. ‘झिम्मा’मध्येही ती एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तिच्या भूमिकेची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील तिच्या बोल्ड अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये अंघोळ करतानाचा एक सीन दाखवण्यात आला आहे. यात सायली बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यानंतर सायलीच्या बोल्ड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

‘झिम्मा’ या चित्रपटात ७ वेगवेगळ्या वयोगटातील महिला आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची भूमिका ही सायली संजीवची आहे. ‘झिम्मा’ हा चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सायलीसोबत या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेवकर, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सात बायका आणि एक पुरुष आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2021 4:59 pm

Web Title: after jhimma trailer release sayali sanjeevs bold scene going viral on social media dcp 98
Next Stories
1 तुझ्या हसण्यानं गं राणी…काळजाचं होतया पाणी!
2 जेनेलिया-रितेशच्या हाउस पार्टीचा व्हिडीओ व्हायरल; पहा व्हिडीओ
3 ‘एक बार जो मैने कमिटमेन्ट कर दी…’, ईदला येणार ‘राधे’ भेटीला
Just Now!
X