News Flash

सुपरस्टार रजनीकांतच्या ‘काला करिकालन’चं पोस्टर पाहिलं का?

लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार..

छाया सौजन्य- ट्विटर

गँगस्टरच्या भूमिकेतून विविध विक्रम रचणाऱ्या ‘कबाली’ या चित्रपटानंतर अभिनेता रजनीकांत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. रंजित (Pa. Ranjith) दिग्दर्शित ‘काला करिकालन’ या तमिळ चित्रपटात ते झळकणार आहेत. रजनीकांत यांच्या जावयाने म्हणजेच अभिनेता धनुषने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. सध्या ट्विटरवरही या चित्रपटाचा हॅशटॅग #Kaala ट्रेंडमध्ये आला आहे.

२८ मे पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तूर्तास चाहत्यांमध्ये आतापासूनच या चित्रपटाविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘काला करिकालन’चं पोस्टर पाहता यातूनही रजनीकांत यांचं वेगळं रुप पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. या पोस्टरमध्ये काळ्या आणि लाल रंगाची सांगड घालण्यात आली असून, त्यावर रजनीकांत rajinikanth यांचा चेहराही दिसतो आहे. एखाद्या रेखाटलेल्या चित्राप्रमाणे दिसणारा त्यांचा चेहरा पाहता त्यातून राग, आक्रोश आणि सूडाच्या भावनेचं प्रतिबिंब पाहायला मिळतंय.

वाचा: रजनीकांतच्या या कट्टर चाहत्याची गोष्ट ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

‘काला करिकालन’ या नावाविषयी विचारलं असता, ‘या चित्रपटामध्ये तमिळ संस्कृतीचं चित्रण करण्यात येणार असल्याचं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं. या चित्रपटाच्या नावावरुन आता बऱ्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. सध्या रजनीकांत बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. चित्रपसृष्टीसोबतच राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे ते राजकारणात प्रवेश करणार का, याबाबतही तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

वाचा: ‘बाहुबली’ प्रभास आहे इंजिनिअर, जाणून घ्या इतर दाक्षिणात्य स्टार्सचं शिक्षण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 12:35 pm

Web Title: after kabali superstar rajinikanth is all set for his next film titled kaala karikaalan south indian actor
Next Stories
1 Rajinikanths entry in politics : ‘टायटॅनिक हिरो ऑफ तमिळनाडू, सन ऑफ इंडिया…. इट इज राइट टाइम’
2 सेलिब्रिटी लेखक : गुरुदक्षिणा
3 ब्रॅड पीटला शाहरुख देणार नृत्याचे धडे!
Just Now!
X