News Flash

प्रेग्नंसीमध्ये दिया मिर्झानेही अवलंबला करीना-अनुष्काचा मार्ग, व्हिडीओ व्हायरल

तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने सोशल मीडिया पोस्टद्वारे आई होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिला ट्रोल केले. आता दियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तिने अभिनेत्री करीना कपूर खान आणि अनुष्का शर्माचा मार्ग आवलंबला असल्याचे म्हटले जात आहे.

करीना आणि अनुष्काने प्रेग्नंट असताना व्यायाम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या पाठोपाठ आता दिया मिर्झा देखील घराच्या छतावर व्यायाम करताना दिसत आहे. दरम्यान तिने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि ट्रॅक पँट परिधान केली आहे. ती ट्रेनरच्या मदतीने व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दियाचा बेबी बंप देखील दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tadka Bollywood (@tadka_bollywood_)

PHOTOS: लग्नानंतर सावत्र मुलीसोबत मालदीवमध्ये दिया मिर्झा घालवतेय वेळ

काही दिवसांपूर्वी दिया कुटुंबीयांसोबत मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. तेथील एक फोटो तिने शेअर करत तिने प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते. अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार आहे. माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले होते.

ऑक्टोबर २०१४ मध्ये दियाने साहिल संघाशी पहिले लग्न केले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये दिया मिर्झा आणि साहिल संघाने सोशल मीडिया पोस्टद्वारे विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. आमच्यात मैत्रीचे नाते कायम राहिलं, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर दियाने वैभव रेखीला डेट केले. लॉकडाउनच्या काळात दिया आणि वैभव यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. अखेर १५ फेब्रुवारी रोजी दोघे लग्नबंधनात अडकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 1:19 pm

Web Title: after kareena kapoor and anushka dia mirza share pregnancy workout video on social media avb 95
Next Stories
1 “आमचं लग्न टिकावं म्हणून मी त्याला सोडलं…”, जया बच्चन यांचा खुलासा!
2 “मला जगात सर्वात जास्त गर्व या गोष्टीचा आहे की……”- रणवीर सिंग
3 ही गोड मुलगी करतेय प्रेक्षकांच्या मनावर राज्य; ओळखलं का ‘या’ अभिनेत्रीला?
Just Now!
X