03 June 2020

News Flash

विकी कौशलनेही पुढे केला मदतीचा हात, PM-Cares फंडद्वारे केली मदत

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यनने देखील मदत केली आहे

अभिनेता विकी कौशल

‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेला अभिनेता म्हणजे विकी कौशल. आता विकी कौशलने करोना व्हायरसशी लढणाऱ्या रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केले आहे. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्याप्रमाणेच विकीनेही PM Cares फंडमध्ये मोठी रक्कम मदत म्हणून दिली आहे.

विकीने याची माहिती इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट करत दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘आज मी माझ्या कुटुंबीयांसोबत घरात बसलो आहे आणि हे मी माझे भाग्यच समजेल. पण काही लोक असे आहेत जे घरी राहू शकत नाही. या कठिण काळासाठी मी PM Cares फंड आणि महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम मदत म्हणून देत आहे. आज आपण एकमेकांसोबत आहोत आणि मला खात्री आहे आपण एकत्र यातून बाहेर पडू’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपापल्या परिने करोनाग्रस्तांना मदत करताना दिसत आहेत. अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत केली. तर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने विदेशात राहूनही PM Cares फंडमध्ये काही रक्कम मदत म्हणून दिली आहे. तसेच इतरांनी देखील जमेल तशी मदत करावी असे आवाहन चाहत्यांना केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 4:14 pm

Web Title: after kartik aryan vicky kaushal donates rs 1 cr to pm cares fund pledge support against covid 19 avb 95
Next Stories
1 बॅटमॅन अवतारात अभिनेता फिरतोय घराबाहेर; व्हिडीओ झाला व्हायरल
2 Coronavirus : लता मंगेशकर यांची ‘लाख’मोलाची मदत
3 Video : सिद्धार्थ जाधवची टिकटॉकवर एंट्री; पहिलावहिला व्हिडीओ पत्नीसोबत
Just Now!
X