News Flash

कतरिनाचा द्वेष करणाऱ्यानेही केले तिचे स्वागत

अर्जुनने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की 'कतरिना कैफ आवडत नाही'

अर्जुन कपूर आणि कतरिना कैफ

कतरिना कैफने काही केलं की त्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात होतेच. आता हेच बघा ना ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हती तेव्हाही तिच्याबद्दल बोलले जात होते आणि आता ती या प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी सक्रीय झालीये तर त्याचीही चर्चा होतेय. बॉलिवूडच्या या ‘चिकनी चमेली’ला सगळेच पसंत करतात हेच म्हणावं लागेल. बॉलिवूडचा ‘सुलतान’ आणि किंग खान यांच्यासोबतच रणवीर सिंग, अक्षय कुमार, आलिया भट्ट यांनीही त्यांच्या लाडक्या मैत्रिणीचे इन्स्टाग्रामवर स्वागत केले आहे. पण, या सगळ्यांमध्ये ती ज्या व्यक्तीला आवडत नाही अशा कलाकारानेदेखील तिची दखल घेतल आहे. आम्ही बोलतोय ते अर्जुन कपूरबद्दल.

अर्जुनने कतरिनाचे वेगळ्या अंदाजात इन्स्टाग्रामवर स्वागत केलंय. अर्जुनने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की ‘कतरिना कैफ आवडत नाही’ या क्लबचा तो सदस्य आहे. या क्लबमध्ये त्याच्यासोबत वरूण धवनही सहभागी आहे. या दोन्ही अभिनेत्यांना सलमानने कतरिनामुळेच दम भरला होता. त्या दिवसापासून हे दोघं या क्लबमध्ये सहभागी झाले होते.

कतरिनाचा आणि त्याचा फोटो शेअर करत त्याने म्हटले की, ‘हॅण्डसम मुलाच्या बाजूला जी उभी आहे ती सध्या फार चर्चेत आहे. नुकतीच ती इन्स्टाग्रामवर आली आहे.’ आतापर्यंत अर्जुन आणि कतरिनाने एकत्र असा कोणताही सिनेमा केलेला नाही पण ते दोघंही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतात. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या एका भागात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ सहभागी झाल्या होत्या. यावेळी अर्जुन कपूरही खास पाहुणा म्हणून गेला होता. तेव्हा अर्जुनने तो कतरिनाचा का द्वेष करतो याचं कारणही सांगितलं. एकदा सलमानने कतरिनाबद्दल चर्चा करत असताना अर्जुन, वरूणला पकडलं आणि त्याबद्दल त्यांची कानउघडणी केली. त्यामुळे त्या दिवसापासून अर्जुन आणि वरूणने हा क्लब सुरू केल्याचं त्याने या शोमध्ये म्हटलं होतं.

अर्जुनसोबतच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही कतरिनाचे इन्स्टाग्रामवर स्वागत केले. ‘तुमचा काला चष्मा काढा आणि इन्स्टाग्रामवर आलेल्या या नवीन मुलीला बघा’, असा मेसेज सिद्धार्थने त्याचा आणि कतरिनाचा फोटो शेअर करत लिहिला. कतरिनाने जेव्हापासून इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरु केले आहे तेव्हापासून सिनेसृष्टीतले अनेक मित्र-मैत्रीणी अनोख्या पद्धतीने तिचे स्वागत करत आहेत. यात सलमान खान आघाडीवर होता. काल किंग खाननेही ‘इन्स्टाग्राम आता अधिक सुंदर दिसेल’, असा मेसेज लिहित कतरिनाचे स्वागत केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 2:46 pm

Web Title: after khans arjun kapoor welcomes katrina kaif on instagram
Next Stories
1 कपिलच्या शोमधील या कलाकारासोबत लग्न करणार सुगंधा मिश्रा?
2 राजामौली, प्रभास १२१ कोटी रुपये शहीदांच्या कुटुंबियांना देणार ही केवळ अफवा
3 केआरकेकडून मोदींना उपरोधिक टोले
Just Now!
X