News Flash

अभिनेता अली जफरवर पुन्हा लैंगिक अत्याचाराचा आरोप

ट्विटरवर पोस्ट शेअर करत केले अलीवर आरोप

प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि संगीतकार अली जफरविरोधात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. मेकअप आर्टिस्ट लीना घानी हिने अलीवर सेक्शुअल हॅरासमेंटचे आरोप केले असून तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. लीनापूर्वी एका पाकिस्तानी गायिकेनेखील त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचेआरोप केले होते.

संबंधित महिलेने तक्रार दाखल करत ट्विटरच्या माध्यमातून अली जफरविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. ‘ गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक आणि न्यायालयीन वादानंतर मी स्वत:साठी लढण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिलांप्रमाणेच पाकिस्तान माझं घर आहे. जर आपण आपल्याच देशातील लैंगिक अत्याचारांविरोधात आवाज उठवत असू तर आपल्यावर अत्याचार होणं, प्रतिमा मलीन करणं किंवा अफवा पसरवलं योग्य आहे?, असा जाब विचारत लीनाने ट्विट केलं आहे.


लीनापूर्वी पाकिस्तानी गायिका, अभिनेत्री मीशा शफीने अलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर लीनाने सिंध उच्च न्यायालयात खटला दाखल करत अलीविरोधात ५०० मिलिअनची नुकसान भरपाई मागितली आहे.

वाचा : ‘आनंद विकत घेता येत नाही, पण…’; नियाने केलं नव्या पाहुण्याचं स्वागत

अली जफरने ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘चश्मेबहाद्दूर’, ‘टोटल सियापा’, ‘किल दिल’, ‘डिअर जिंदगी’ यांसारख्या चित्रपटात त्याने भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:15 pm

Web Title: after meesha shafi pakistani artist leena ghani lodged harassment lawsuit against ali zafar ssj 93
Next Stories
1 ‘आनंद विकत घेता येत नाही, पण…’; नियाने केलं नव्या पाहुण्याचं स्वागत
2 लता मंगेशकरांवर टीका करणाऱ्याला अदनान सामीने सुनावलं; म्हणाला..
3 Video: व्हिसा न घेताच अभिनेता पोहोचला दुबई अन्…
Just Now!
X