देशात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पिया वाजपेयीचा भावाचे निधन झालंय. करोनामुळे पियाच्या भावाचा मृत्यू झाला आहे. आज ४ मे रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला.

पियाने ही बातमी तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. “माझा भाऊ नाही राहिला..,”असे ट्वीट पियाने केले. या आधी पियाने ट्वीट करत तिच्या भावासाठी बेड आणि व्हेटिंलटरची गरज असल्याचे सांगितले होते. “मला जिल्हा फरुकबाद, कामगंज ब्लॉकमध्ये तातडीची मदत हवी आहे. यूपी..एक बेड आणि व्हेंटिलेटरची गरज आहे..माझा भाऊ मृत्यूशी झुंज देत आहे…मला मदत करा, जर तुम्ही कोणाला ओळखत असाल तर कृपया या नंबरवर संपर्क साधा 9415191852 अभिषेक..आम्हाला मदत पाहिजे..,” असे ट्वीट पियाने केले होते.

पियाला मदत न मिळाल्यामुळे तिने शेवटी भाजप नेते तेजिंदर पालसिंग बग्गा यांची मदत घेतली. तेजिंदर यांनी पियाला फोन देखील केला पण त्यांना काहीच मदत मिळाली नाही. त्यानंतर पियाला चित्रपट निर्माता ओनीर आणि अभिनेता रोहित भटनागर यांनी देखील फोन केला पण तिच्या भावापर्यंत मदत पोहोचू शकली नाही.

दरम्यान, या आधी अभिनेत्री निक्की तांबोलीच्या भावाचे करोनाने निधन झाले. एवढंच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली. तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.