15 February 2019

News Flash

तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीचा सचिन तेंडुलकरवर खळबळजनक आरोप

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिने क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला लक्ष्य केले आहे.

श्री रेड्डी, सचिन तेंडुलकर

चित्रपटसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवत भररस्त्यात टॉपलेस होणाऱ्या अभिनेत्री श्री रेड्डीने आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिने क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर थेट आरोप केले आहेत. श्री रेड्डीच्या या पोस्टने अनेकांनाच पेचात पाडलं असून तिच्यावर टीकासुद्धा होत आहे. श्री रेड्डीने दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौर हिच्यासोबत सचिनचं नाव जोडलं आहे.

श्री रेड्डीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सचिन तेंडुलकरला थेट लक्ष्य करत, एक पोस्ट लिहिली. ‘सचिन तेंडुलकर हैदराबादमध्ये आला असता एका ‘चार्मिंग गर्ल’ने त्याच्यासोबत रोमान्स केला. महान व्यक्ती चांगला खेळ खेळू शकतात, माझा अर्थ चांगला रोमान्स करू शकतात असा आहे,’ असं श्री रेड्डीने पोस्टमध्ये लिहिलं. या पोस्टमध्ये तिने ज्या चार्मिंग गर्लचा उल्लेख केला आहे, ती तेलुगू अभिनेत्री चार्मी कौर असल्याचं मानलं जात आहे. आता यावर सचिन तेंडुलकर किंवा स्वत: चार्मी कौर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

श्री रेड्डीने यापूर्वीही बरेच गौप्यस्फोट केले आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण, नानी, टॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते सुरेश बाबूचा मुलगा अभिराम दग्गुबती अशा अनेकांवर तिने कास्टिंग काऊचचे आरोप केले होते. हैदराबादमधील ‘तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स’च्या समोरील रस्त्यावर टॉपलेस होत सर्वांनाच धक्का दिला होता. तेव्हापासून ती सतत काही ना काही कारणाने चर्चेत आहे.

First Published on September 12, 2018 1:00 pm

Web Title: after pawan kalyan sri reddy now targets sachin tendulkar