सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत पाहायला मिळते. संपर्कातून करोनाची लागण होण्याचा धोका वाढत असल्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी धूळवड साजरा न करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर हिंदी कलाकारांसह आता मराठी कलाकारांनीही होळी खेळणार नसल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत करोनाचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. मात्र करोना विषाणू संसर्गाची काळजी घेण्यासाठी कलाकारांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बुधवारी करोना विषाणू संसर्गाची काळजी म्हणून सर्वसामान्यांनी प्रतिबंधानासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, असे आवाहान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून राज्यातील जनतेस केले आहे.

जगभरात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.