News Flash

करोनावर मात केल्यानंतर कंगना रनौतने कुटूंबासह केलं सुवर्ण मंदिर दर्शन

म्हणाली, "सौंदर्य पाहून निशब्द झाले..."

(Photo: Instagram@kanganaranaut)

आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या कुटूंबासह वेळ घालवताना दिसून येतेय. अभिनेत्री कंगना रनौत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरीच सक्रिय असते आणि प्रत्येक गोष्ट ती तिच्या फॅन्ससोबत शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. यात ती तिच्या गावी मनालीमध्ये कुटूंबासोबत दिसून आली. तिने तिच्या कुटूंबासह सुवर्ण मंदिरचं दर्शन घेतलंय. याचे फोटोज आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

कंगनाने हे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटोज शेअर करताना ती पहिल्यांदा सुवर्ण मंदिरचं दर्शन घेतलं आणि इथलं सौंदर्य पाहून निशब्द झाल्याची भावना तिनं व्यक्त केली. हे फोटोज शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात तिने लिहिलं, “आज मी श्री हरमंदिर साहिब सुवर्ण मंदिरमध्ये गेली होती…जरी मी उत्तर भारतात लहानाची मोठी झाली असली तरी माझ्या कुटूंबातील सगळेच जण कित्येकदा या मंदिरात येऊन गेले आहेत…फक्त माझी इथे येण्याची ही पहिली वेळ होती…सुवर्ण मंदिरचं सौंदर्य आणि दिव्यता पाहून मी निःशब्द आणि आश्चर्य झाले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रनौत करोनाने संक्रमित झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर तिने करोनावर यशस्वी मात केली आणि आता तिची प्रकृती स्वस्थ आहे. त्यानंतर ती पहिल्यांदा तिच्या गावी मनालीमध्ये कुटूंबासह आली आहे. याचेच फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

यावेळी अभिनेत्री कंगना रनौत पारंपारिक सलवार सूटमध्ये दिसून आली. तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. यावर एक युजरने कमेंट केलं की, “कंगना मॅडम, तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात.” तसंच “तुम्हाला सलवार सूट सुंदर दिसतो”, असं म्हणत आणखी एका युजरने तिचं कौतुक केलं आहे.

कंगना रनौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिच्या आगामी ‘थलाइवी’ चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहे. कंगनाच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तिचा हा चित्रपट गेल्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतू करोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. याशिवाय कंगना ‘धाकड’ नावाच्या चित्रपटातून सुद्धा झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 8:29 pm

Web Title: after recovering from covid kangana ranaut reached golden temple with family see post prp 93
Next Stories
1 “आता तर मी बेरोजगार आहे…”; लॉकडाउनमध्ये ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख कामाच्या शोधात
2 5G नेटवर्क विरोधात अभिनेत्री जूही चावलाने दिल्ली हायकोर्टात दाखल केली याचिका
3 चिमुकल्या अहिल्याने साजरी केली अहिल्याबाई होळकर यांची २९६वी जयंती
Just Now!
X