News Flash

रेखा यांच्या बंगल्यानंतर झोया अख्तरची इमारतही केली सील

रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण

झोया अख्तर

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा मुंबईतील वांद्रे इथला बंगला सील केल्यानंतर आता मुंबई महापालिकेने दिग्दर्शिका झोया अख्तरची इमारतही सील केली आहे. रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण होताच बँडस्टँड परिसरातील त्यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला सील करण्यात आला. झोयाची इमारती त्यांच्या बंगल्याच्या बाजूलाच असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तीसुद्धा सील करण्यात आली आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा फलक तिथे लावण्यात आला आहे.

रेखा यांच्या दोन सुरक्षारक्षकांपैकी एका सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांचा बंगला सील करण्यात आला असून संपूर्ण परिसर महापालिकेकडून सॅनिटाइज करण्यात आला आहे.

अभिनेत्री सारा अली खानच्या स्टाफलाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. याआधी आमिर खान, करण जोहर, बोनी व जान्हवी कपूर यांच्या स्टाफला करोनाची लागण झाली होती. शनिवारी महानायक अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनाही करोनाची लागण झाली. या दोघांवर सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 5:25 pm

Web Title: after rekha bungalow zoya akhtar building sealed as precautionary measure ssv 92
Next Stories
1 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टवरून केतकी चितळेच्या अडचणीत वाढ
2 पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांच काय झालं?; बॉलिवूड संगीतकाराचा केंद्र सरकारला सवाल
3 गोकुलधाम सोसायटी प्रेक्षकांना हसवण्यासाठी झालीये सज्ज; ‘या’ दिवशी पहिला भाग होणार प्रदर्शित
Just Now!
X