News Flash

‘रिप्ड शर्टबद्दल कुणाला चिंता आहे का’?, अदनान सामीची मजेशीर पोस्ट व्हायरल

फाटलेल्या जीन्स प्रकरणानंतर अदनाची पोस्ट

‘रिप्ड शर्टबद्दल कुणाला चिंता आहे का’?, अदनान सामीची मजेशीर पोस्ट व्हायरल

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या फाटक्या जिन्सवरील वक्तव्यामुळे सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. यात अभिनेत्री कंगना रणौत, बिग बींची नात नव्या नंदा, उर्मिला मातोंडकर, गुल पनाग अशा अनेक अभिनेत्रींनी रावत यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मात्र यात आता गायक अदनान सामी यानं एक मजेशीर पोस्ट करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अदनान सामी याने ट्विटरवर एक फोटो शेअर करत पोस्ट लिहली आहे. अदनान सामीने शेअर केलेल्या फोटोत एकीकडे एका मुलीचे फक्त पाय दिसत असून तिने रिप्ड म्हणजेच फाटलेली जीन्स घातल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे एका पुरुषाचं त्याच्या शर्टमधून पोट दिसत असल्याचं पाहायला मिळतंय. एका जाड व्यक्तीच्या शर्टच्या बटनांमधून त्याचं पोट दिसतंय हे दाखवण्याचा अदनानने प्रयत्न केला आहे.

या पोस्टमध्ये अदनान म्हणाला आहे,” कारण आपण अलिकडे प्रत्येक गोष्टीमध्ये चिंता व्यक्त करत आहोत. मग ती आपल्या कामाची असो वा नसो. आपण फाटक्या शर्टबद्दल चिंता व्यक्त करू शकतो का?” अशी उपहासात्मक पोस्ट लिहत अदादने या प्रकरणात उडी घेतली आहे.अदानान सामीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत होतेय. तसंच त्याच्या पोस्टला अनेकांची पसंती मिळतेय.

फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असं विधान रावत यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. टीकेचे धनी ठरल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. वादग्रस्त विधानावर बोलताना “आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन्स वापरण्याला विरोधच आहे,” असं रावत यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 5:06 pm

Web Title: after ripped jeans issue raised by cm tirath singh rawat singer andan sami posted ripped shirt photo post viral
Next Stories
1 कसा शूट झाला अंजी पश्याचा स्विमिंग पूल सीन; संपूर्ण टीमची पूलमध्ये धमाल
2 ‘विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका’, स्वत:चे अनुभव सांगत नीना गुप्ता म्हणाल्या…
3 संधी साधत कंगनाचा महाराष्ट्र सरकारवर पलटवार; म्हणाली,”मी खरी देशभक्त”
Just Now!
X