चित्रपटांमध्ये होणारा सेन्सॉरचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेकदा दिग्दर्शक आणि सेन्सॉरमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते. ‘न्यूड’ आणि ‘एस. दुर्गा’ या चित्रपटांबद्दल झालेले वाद तर जगजाहीर आहेत. ‘सेक्सी दुर्गा’वरून ‘एस दुर्गा’ शीर्षक करण्यात आलेल्या या चित्रपटातील अनेक दृश्यांना सेन्सॉरने कात्री लावली होती. त्यानंतर आता बिसाहडा कांडच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘द ब्रदरहुड’ चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात अडकला आहे.

वाचा : रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव कळलं का?

सेन्सॉर बोर्डाने ‘द ब्रदरहुड’मधील तीन दृश्यांवर कात्री चालवण्याचे आदेश दिले आहेत. ही तीनही चित्रपटातील महत्त्वाची दृश्यं असल्याचे निर्माता आणि पत्रकार पंकज पराशर यांचे म्हणणे आहे. दादरीत गोमांस ठेवण्याच्या मुद्यावरून मोहम्मद अखलाख याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर गावातील परिस्थिती कशी बदलली याचे चित्रीकरण चित्रपटात करण्यात आले आहे. या घटनेमुळे ग्रेटर नोएडामधील घोडी बछेडा आणि तिल बेगमपूर या दोन गावांमध्ये निर्माण होणारे ऐतिहासिक नाते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अखलाखच्या हत्याप्रकरणाला तेथील स्थानिक लोक राजकारण असल्याचे मानतात. पण, सेन्सॉरने ही महत्त्वाची दृश्यं हटवण्याचे आदेश दिले आहेत, असे निर्माते म्हणाले.

वाचा : सारिका यांना त्यांचे घर परत मिळवून देण्यासाठी आमिरचा पुढाकार?

ग्रेटर नोएडामधील एका गावात मुस्लिम समाजाचे लोक तर दुसऱ्या गावात हिंदू समाजाचे लोक राहतात.