महाराष्ट्रातील सध्याचा प्रेक्षक हा अर्थपूर्ण सिनेमे पाहण्यासाठी तयार असून, दिग्दर्शक, निर्मात्यांना आता आता दर्जेदार सिनेमे द्यावे लागतील, असे मत अभिनेत्री किशोरी किशोरी शहाणे यांनी व्यक्त केले आहे. ‘सैराट’ला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. ‘सैराट’नंतर मराठी चित्रपटसृष्टीला नवचैतन्य मिळाल्याचे त्या म्हणाल्या. यापूर्वी मराठी प्रेक्षकांना आशयपूर्ण सिनेमे पाहायला मिळत नव्हते. उदा. माझ्या काळात विनोदी चित्रपटांचा भरणा होता आणि तसे सिनेमेच चालत होते. त्यामुळे वेगळ्या विषयांना हात घातला जात नव्हता. पण राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘श्वास’ चित्रपटानंतर वातावरण बदलून गेले. आता मराठी प्रेक्षक अर्थपूर्ण चित्रपटाला आवर्जुन जातात आणि पसंती देखील देतात. किरोशी शहाणे सध्या ‘लाईफ ओके’ या टेलिव्हिजन वाहिनीवरील ‘नागार्जुना..एक योद्धा’ या मालिकेत दिसणार आहेत. लकरच ही मालिका सुरू होणार आहे.
एखाद्या चित्रपटाच्या मागे कोणती वाहिनीचे पाठबळ आहे. हे देखील चित्रपटाच्या यशासाठी खूप महत्त्वाचे ठरते. मराठी चित्रपट हीट होण्यामागे आता मार्केटींग हा महत्त्वाचा दुवा ठरू लागला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याशिवाय, प्रेक्षकांना आता त्यांच्या मनाला भिडणाऱया, त्यांच्या आयुष्याशी मिळत्याजुळत्या कथा हव्या आहेत, असेही किशोरी शहाणे पुढे म्हणाल्या.