19 October 2019

News Flash

Video: महिन्याला दीड हजार रुपये कमावणाऱ्या अमरावतीच्या बबिता झाल्या करोडपती

एक सामान्य स्त्रीसुद्धा तिचं स्वप्न पूर्ण करू शकते हे बबिता यांना सिद्ध करायचे होते आणि त्यांनी ते करून दाखवलं.

बबिता ताडे

ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा ‘कौन बनेगा करो़डपती’ (केबीसी) हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोचे अकरावे पर्व सुरू असून सरोज राज हे नुकतेच पहिले करोडपती झाले. आता अमरावतीच्या बबिता ताडे या करोडपती झाल्या आहेत. सोनी वाहिनीकडून सोशल मीडियावर बबिता यांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

बबिता या शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवण्याचं काम करतात. या कामातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नाही. फक्त दीड हजार रुपये इतका पगार त्यांना मिळतो. केबीसीच्या माध्यमातून एक सामान्य स्त्रीसुद्धा तिचं स्वप्न पूर्ण करू शकते हे बबिता यांना सिद्ध करायचे होते आणि त्यांनी ते करून दाखवलं.

आणखी वाचा : ..आणि असे झाले अमिताभ-जया यांचे शुभमंगल

‘केबीसी’ हा नेहमीच लोकप्रिय रिअॅलिटी शो ठरला आहे. यंदाचे पर्वसुद्धा टीआरपीच्या क्रमवारीत सतत वरच्या स्थानी राहिले आहे. केबीसीच्या माध्यमातून आजवर अनेकांनी त्यांची स्वप्नं पूर्ण केली आहेत. सोनी वाहिनीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओत बबिता यांच्या संघर्षमयी प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे.

First Published on September 15, 2019 4:11 pm

Web Title: after sanoj raj kaun banega crorepati 11 amitabh bachchan finds another winner babita tade ssv 92