18 September 2020

News Flash

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ नंतर ‘खिचडी’ प्रेक्षकांच्या भेटीला?

'खिचडी' ही मालिका छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती.

'खिचडी' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते.

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेनंतर प्रेक्षकांच्या मनात घर केलेली आणखी एक धम्माल फॅमिली प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचे संकेत मिळत आहेत. प्रफुल आणि हंसा यांची ‘खिचडी’तील पारेख फॅमिली वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत जमनादास मजेथिया याने मुंबईतील एका कार्यक्रमात दिले. ‘खिचडी’च्या प्रेक्षकवर्गासाठी ही आनंदाची बातमीच आहे. हॅट्स ऑफ प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या मालिकेवरुन चित्रपटाचीही निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये मालिकेतील हंसाच्या भूमिकेतील सुप्रिया पाठक (हंसा पारेख) जमनादास मजेठिया (हिमांशू पारेख) अनंग देसाई ( तुलसीदास पारेख) निमिशा (जयश्री पारेख) यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

सध्याच्या घडीला अनेक जुन्या सीरिज नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये टेलिव्हिजन विश्वात बऱ्याच मालिका आणि विविध धाटणीच्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. त्यातही नव्या संकल्पना, नवे विचार आणि नव्या जोमाच्या कलाकारांच्या साथीने निर्माते-दिग्दर्शक प्रेक्षकांचे सर्वतोपरी मनोरंजन करण्यासाठी प्रयत्नशील दिसतात. नुकतीच छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ही २००४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली विनोदी मालिका पुन्हा एकदा नव्या उत्साहात प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेनंतर आता प्रेक्षकांना हॅट्स ऑफ प्रोडक्शनची ‘खिचडी’ कोणत्या स्वरुपात भेटीला येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

गेल्या वर्षी जून महिन्यात ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’च्या संपूर्ण टीमने एक गेट-टुगेदर केले होते. त्यांच्या या गेट-टुगेदरचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मालिकेचा नवीन सीझन येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आधीच्या सीझनप्रमाणेच हाही सीझन सतीश शाह, रत्ना पाठक शाह, सुमित राघवन, रुपाली गांगुली, राजेश कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अरविंद वैद्य हे मधुसूदन फुफा आणि देवेन भोजानी दुष्यंतच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 4:25 pm

Web Title: after sarabhai vs sarabhai khichdi to return as web series
Next Stories
1 सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळील गोदामाला भीषण आग
2 ‘काश्मीरप्रश्नी बहुपक्षीय चर्चा हवी’- अध्यक्ष एर्डोगान
3 ‘काश्मीरमधल्या हिंसाचारामागे राष्ट्रविरोधी शक्ती’
Just Now!
X