News Flash

‘द फॅमिली मॅन २’च्या ट्रेलरमध्ये आसिफ बसरा यांना पाहून चाहते झाले भावूक

सहा महिन्यांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली होती

नुकताच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी, समंथा अक्किनेनी आणि प्रियमणि हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण ट्रेलर प्रदर्शित होताच या कलाकरांसोबतच अभिनेते आसिफ बसरा हे चर्चेत आहे.

सहा महिन्यांपूर्वी अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली. आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. नैराश्यामध्ये त्यांनी इतके टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात होते. आता त्यांच्या निधनानंतर ‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजमध्ये त्यांना पाहून चाहते भावूक झाले आहेत. अनेकांनी ट्विटरवर त्यांचे फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा : हुश्श! ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘द फॅमिली मॅन’ या सीरिजमध्ये आसिफ मानसोपचार तज्ज्ञांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 6:29 pm

Web Title: after seeing asif basra in the family man 2 trailer fans get emotional avb 95
Next Stories
1 “मला पश्चाताप नाही, मी फक्त…”; ‘त्या’ व्हिडीमुळे ट्रोल झाल्यानंतर दीपिका सिंह म्हणाली…
2 प्रियांकाने बॉयफ्रेंडल कपाटात लपवलं, मावशीने आईला फोन केला अन्..
3 Maharani Trailer: सोनी लिवच्या वेब सिरीजमध्ये हुमा कुरेशी बनली ‘महाराणी’; जबरदस्त ट्रेलर रिलीज
Just Now!
X