News Flash

‘पटाखा’चं कौतुक करायला शब्दच नाहीत – अनुराग कश्यप

विशाल भाराद्वाज यांच्या 'पटाखा' या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत २४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप

‘स्वातंत्र्य दिना’चं निमित्त साधून ‘पटाखा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सख्ख्या बहिणी पण पक्क्या वैरी असलेल्या दोन बहिणींची धम्माल कथा ‘पटाखा’च्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ‘दंगल’ फेम सान्या मल्होत्रा आणि राधिका मदान सर्वात हटके अंदाजात रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.विशेष म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतूक केलं आहे.

विशाल भाराद्वाज यांच्या ‘पटाखा’ या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत २४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला असून चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही हा ट्रेलर पाहिला. ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांनी ट्विट करत अनोख्या शैलीमध्ये या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

‘विशाल भारद्वाज सर तुम्ही कुठे आहात. कोणत्या मातीपासून तयार झाला आहात. या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी काय म्हणू.. छानच. ‘पटाखा’चं कौतूक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत’ अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, या ट्विटमध्ये त्यांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका वठविणाऱ्या सान्या मल्होत्रा आणि राधिका मदान यांनाही टॅग केलं आहे. पटाखामध्ये विनोदवीर सुनील ग्रोवरही झळकणार असून पहिल्यांदाच तो एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 7:16 pm

Web Title: after seen pataakha trailer anurag surprising reaction says this
Next Stories
1 महिलांच्या ‘लस्ट स्टोरी’बाबत काय म्हणतोय हृतिक?
2 Video : वरुण-अनुष्का राष्ट्रध्वजाबद्दल काय म्हणाले ऐकलत का ?
3 #MazyaNavryachiBayko : राधिकाने विकत घेतली ३०० कोटींची कंपनी; सोशल मीडियावर भन्नाट विनोद व्हायरल
Just Now!
X