News Flash

‘सडक २’ चे पोस्टर प्रदर्शित केल्यावर आलियाने उचलले मोठे पाऊल?

जाणून घ्या आलियाने नेमकं काय केलं?

‘सडक २’ चे पोस्टर प्रदर्शित केल्यावर आलियाने उचलले मोठे पाऊल?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. पण त्याच्या निधानानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला. त्यानंतर चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरसोबत अनेक स्टार किड्सवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. अभिनेत्री आलिया भट्टला देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. नुकताच आलियाच्या ‘सडक २’ या चित्रपटाचे पोस्ट प्रदर्शित झाले. हे पोस्ट प्रदर्शित केल्याानंतर नेटकऱ्यांच्या टीकेपासून वाचण्यासाठी आलियाने मोठे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

दिग्दर्शक महेश भट्ट यांचा ‘सडक’ हा बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. या हिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आलिया दिसणार आहे. ‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. तसेच या चित्रपटाची निर्मिती मुकेश भट्ट यांनी केली आहे. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

नुकताच आलियाने एका लाईव्ह चॅटमध्ये ‘सडक २’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. महेश भट्ट यांनी ‘सडक २’ चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आलियाने मात्र ट्रोलर्सपासून वाचण्यासाठी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सोशल मीडिया अकाऊंटचे कमेंट बॉक्स चाहत्यांसाठी बंद केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता आलिया फॉलो करत असलेले लोकं केवळ तिच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करु शकतात.

‘सडक’ चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह आलिया देखील चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्यावेळी चित्रपटात संजय दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 7:39 pm

Web Title: after sharing the poster of sadak 2 now alia bhatt took this big step avb 95
Next Stories
1 सलमानचं करिअर डेंजर झोनमध्ये? ऑनलाईन पोलमध्ये भाईजानला नेटकऱ्यांची नापसंती
2 Instagram Rich List 2020: ड्वेन जॉन्सन एका पोस्टसाठी घेतो ७ कोटी रुपये
3 ‘जोधा अकबर’मधील गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लागले होते तब्बल ९ तास
Just Now!
X