09 August 2020

News Flash

अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या ‘उमेश दादा’ला मुंबई पोलिसांकडून अटक

"महिलांना धमकी द्याल तर तरुंगात जाल"

Mumbai Police Arrests Umesh Dada

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन थेट बलात्काराची धमकी देणाऱ्या इम्तियाज शेख या तरुणाला मुंबई पोलिसांनी अट केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वत:च तक्रार दाखल करुन घेत इम्तियाजला ताब्यात घेतलं आहे. सोमवारी करण्यात आलेल्या या अटकेच्या कारवाईबद्दल मुंबई पोलिसांनीच ट्विटवरुन माहिती दिली आहे.

नक्की वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाली होती स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ

इम्तियाज शेख सोशल मिडियावर उमेश दादा या नावाने अकाउंट चालवतो. याच अकाउंटवरुन त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रमाणी जोशुआबद्दल अपशब्द वापरत, अश्लील भाषेत तिला बलात्काराची धमकी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी स्वत:हून तक्रार नोंदवून घेत शेखला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत अकाउंटवरुन शेखच्या अटकेसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

“मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सु मोटो पद्धतीने तक्रार दाखल करुन घेत अपमानजनक, धमकी देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करुन शेअर करणाऱ्या उमेश दादा नावाने अकाउंट असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे. या फोटोवर मुंबई पोलिसांनी, “महिलांना धमकी द्याल तर तरुंगात जाल” अशा ओळी पोस्ट केल्या आहेत.

सोमवारी सकाळी वडोदरामध्ये शहर पोलिसांनी जोशुला बत्काराची धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या शुभम मिश्राला अटक केली. इन्स्टाग्रामवरुन जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या शुभमला वडोदरा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली होती.

नक्की वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना संतापली, म्हणाली… 

काय आहे प्रकरण?

एका स्टँडअप व्हिडिओमध्ये कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी  शनिवारी जाहीर माफी मागितली. एका स्टँडअप शोदरम्यान जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जोशुआचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला त्यानंतर तीने समोर येत याप्रकरणी ट्विटवरुन माफी मागितली. मात्र रविवारी या प्रकरणाने एक नवं वळणं घेतलं. जोशुआला विरोध करताना काही व्हिडिओ कंटेंट क्रिएट करणाऱ्यांनी व्हिडिओ पोस्ट करुन जोशुआला थेट बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात अभिनेत्री स्वरा भास्करनेही आक्षेप नोंदवत असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करा असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 8:53 am

Web Title: after shubham mishra mumbai police arrests umesh dada for abusive video against comedian agrima joshua scsg 91
Next Stories
1 ….अन् अशी मिळाली शैलेश लोढाला ‘तारक मेहता’ची भूमिका
2 छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना संतापली, म्हणाली…
3 लॉकडाउन काळात सोनम कपूर पोहचली लंडनमध्ये
Just Now!
X