News Flash

सलमान खान पोहोचला लिलावती रुग्णालयात, जाणून घ्या कारण

रुग्णालया बाहेरील त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत

सलमान खान पोहोचला लिलावती रुग्णालयात, जाणून घ्या कारण
(Photo: Varinder Chawla)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दुपारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात पोहोचला होता. रुग्णालयात जातानाचे सलमानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सलमान रुग्णालयात का चालला आहे? त्याची प्रकृती ठिक आहे ना? तो करोना लस घेण्यासाठी तर गेलेला नाही ना? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात येत होते. आता खुद्द सलमानने ट्वीट करत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बॉलिवूडमधील इतर कलाकारांप्रमाणेच सलमानने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर ट्वीट करत करोनाची लस घेतली असल्याचे सांगितले आहे. त्याने ट्वीटमध्ये ‘आज मी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे…’ या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे. त्यामुळे आता सलमान खान लिलावती रुग्णालयात गेल्याचे कारण समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘राधे’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. या चित्रपटात दिशा पटाणी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत, ” ईदची कमिटमेन्ट दिली होती. ईदलाच येणार क्यू की एक बार जो मैने…” असे कॅप्शन दिले होते. चाहत्यांना दिलेले वचन पाळत असल्याचे त्याने या कॅप्शनमधून सांगितले होते.

येत्या काळात सलमान ‘टाइगर 3’, ‘किक 2’ आणि ‘कभी ‘ईद कभी दीवाली’ या सिनेमातून झळकणार आहे. तसंच किंग खानच्या ‘पठाण’ या सिनेमात सलमान पाहुण्या कलाकालाच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2021 7:02 pm

Web Title: after spotted at lilavati hospital salman khan announces he received first covid 19 vaccine avb 95
Next Stories
1 अच्युत पोतदार ठरले ‘झी मराठी अवॉर्ड २०२०-२१’ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी
2 अरबाज खानने मलायका अरोराला पाठवले खास गिफ्ट, जाणून घ्या कारण
3 ‘…तर मी साराला मारेन’, सैफ अली खानच्या एक्स वाइफचा खुलासा
Just Now!
X