News Flash

सलमानला पाठिंबा दिल्याने सुनील ग्रोवर झाला ट्रोल, दिले अनोख्या अंदाजात उत्तर

अभिनेता सुनिल ग्रोवरने सलमानला पाठिंबा देत ट्विट केले होते

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खान आणि बॉलिवूडमधील इतर कलाकारांवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. सलमानला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर सलमानने ट्विट करत सुशांतला श्रद्धांजली वाहिली होती. त्याच्या या ट्विटला पाठिंबा देत अभिनेता सुनिल ग्रोवरने देखील ट्विट केले होते. पण सुनिलने सलमानला पाठिंबा देणे नेटकऱ्यांना फारसे आवडले नाही. त्यांनी सुनिलला देखील सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.

‘मला सलमान आवडतो आणि मी त्याचा आदर करतो’ असे सुनिलने ट्विटमध्ये म्हटले होते. त्याच्या ट्विटनंतर त्यालाही सोशल मीडयावर ट्रोल करण्यात आले होते. पण सुनिलने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

सुनिलने त्याला ट्रोल केल्यानंतर पुन्हा एक ट्विट केले आहे.

त्या ट्विटमध्ये त्याने, ‘आता मला पेड ट्रोलर्सला कामाला लावण्यास मजा यायला नको. हे देवा मला आता नव्या मनोरंजनपासून वाचव’ असे त्याने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 5:10 pm

Web Title: after supooring salman khan sunil grover gets trolled avb 95
Next Stories
1 ‘तान्हाजी’मधला धैर्यशील म्हणतोय, “नैराश्यावर अशी करुया मात”
2 “दर वर्षी हे चिनी लोक हृदय तोडतात”; अभिनेत्याचा ‘डॉग मीट फेस्टिव्हल’ला विरोध
3 ‘कुछ कुछ होता है’मध्ये सलमान ऐवजी या अभिनेत्याची निवड केली होती करण जोहरने
Just Now!
X