अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद भारतीयांसाठी एका सुपरहिरो प्रमाणे काम करत आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने केलेले मदत कार्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. सोनू सूदने आजवर लाखो नागरिकांची मदत केली आहे. मग ते स्थलांतर करणाऱ्या मजुरांसाठी असो किंवा लॉकडाउनमुळे पोटाला उपवास घडणाऱ्या गरजूंसाठी असो सोनू सूद सर्वांच्या मदतीला धावून आला आहे. आता तो ऑक्सिजन, रेमडेसिविर याचा तुटवडा जाणवत असताना गरजू रुग्णांना त्याचा तातडीने पुरवठा करण्याचा प्रयत्न देखील करत आहे. दरम्यान कोलकाता संघातील स्टार खेळाडू हरभजन सिंगला देखील सोनू सूदने मदत केली आहे.

हरभजन सिंहने ट्वीट करत मदत मागितली होती. ‘एक रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने हवे आहे’ असे त्याने ट्वीटमध्ये म्हटले असून त्यासोबत हॉस्पिटलचा पत्ता आणि फोन नंबर दिला होता. ते ट्वीट पाहून सोनू सूदने उत्तर देत ‘भज्जी, लवकरात लवकर पोहोचवतो’ असे म्हटले होते.

आणखी वाचा : प्रियांकाच्या घरातल्यांना निक नाही तर ‘महादेव’ मालिकेतील या अभिनेत्याला बनवायचे होते जावई

सोनू सूदने केलेल्या मदतीनंतर हरभजनने आभार मानले आहेत. ‘धन्यवाद मित्रा’ असे भज्जीने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी सोनू सूदने सुरेश रैनाला मदत केली होती. सुरेश रैनाने ट्वीट करत मीरतमध्ये राहणाऱ्या त्याच्या ६५ वर्षीय काकीसाठी तातडीने ऑक्सिजनची गरज असल्याचे म्हटले होते. या ट्वीटमध्ये रैनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केलं होतं. पण योगी आदित्यनाथ यांचा रिप्लाय येण्याआधीच रिप्लाय आला तो अभिनेता सोनू सूदचा!