करोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले. या २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. म्हणून सरकाराने प्रेक्षकांच्या मागणीनुसार ९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. पण ‘रामायण’ प्रदर्शित झाल्यानंतर एका अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून स्वरा भास्कर आहे. स्वरा अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून बिनधास्तपणे तिचे मत मांडत असते. आणि त्यामुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. पण यावेळी परिस्थिती मात्र उलट आहे. स्वराने कोणतेही वक्तव्य केलेले नाही किंवा सोशल मीडियाद्वारे तिचे मत मांडलेले नाही. तरी देखील स्वराला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

स्वराची तुलना ‘रामायणा’मधील एका पात्राशी केली जात आहे. हे मात्र म्हणजे राणी कैकयीची दासी मंथरा आहे. रामायण मालिकेतील मंथरा आणि त्या बाजूला स्वराचा फोटो लावून नेटकऱ्यांनी स्वराची चांगलीच फिरकी घेतली आहे. अनेकांनी तिला आताच्या काळातील मंथरा असे म्हटले आहे.