News Flash

टेलिव्हिजनचा ‘महादेव’ बॉलिवूडच्या वाटेवर

देशसेवेचा एक वेगळा दृष्टीकोन मांडणाऱ्या या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगत मोहितने त्याची उत्सुकता व्यक्त केली.

मोहित रैना, Mohit Raina

टेलिव्हिजन विश्वात ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतून शंकराची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैना म्हणजे प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी येणारा अभिनेता. टेलिव्हिजन विश्वातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा मोहित सध्या त्याच्या बॉलिवूड पदार्पणासाठी तयारी करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘उरी’ या चित्रपटातून मोहित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्याच्या घडीला मोहितने त्याच्या सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्ण केलं असून, आता तो पूर्णपणे या चित्रपटावर म्हणजेच बॉलिवूड पदार्पणावर लक्ष केंद्रीत करत आहे. मोहित सध्या ‘सरफरोश: सारागढी १८९७’, या मालिकेत काम करत आहे. ‘उरी’ या चित्रपटातून तो एका सैन्यदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री आणि मोहितची तथाकथित प्रेयसी मौनी रॉय हीसुद्धा खिलाडी कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बी टाऊनमध्ये पदार्पण करणार आहे, त्यामुळे टेलिव्हिजन विश्वातील या जोडीला खऱ्या अर्थाने बॉलिवूडची लॉटरी लागली, असंच म्हणावं लागेल.

FIFA World Cup 2018 : …म्हणून स्पर्धेसाठी पात्र ठरूनही भारतीय संघ खेळला नाही १९५०चा वर्ल्डकप!

देशसेवेचा एक वेगळा दृष्टीकोन मांडणाऱ्या या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगत मोहितने त्याची उत्सुकता व्यक्त केली. ‘भारतीय सैन्यदल सेवेत रुजू होण्याचं माझं स्वप्न होतं. ते स्वप्न काही कारणाने साकार होऊ शकलं नाही. पण, मला जेव्हा जेव्हा सैन्यदल अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा मी त्या संधीचं सोनं करतो. स्वत:लाच आव्हान देणाऱ्या भूमिका साकारणं मला आवडतं’, असं मोहित म्हणाल्याचं वृत्त ‘डेक्कन क्रोनिकल’ने प्रसिद्ध केलं आहे.
विकी कौशल, परेश रावल यांसारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मोहितने आनंद व्यक्त केला. त्यासोबत उरी हल्ल्यावर भाष्य करणाऱ्या कथानक असणाऱ्या चित्रपटाचा भाग होता आलं याविषयीसुद्धा त्याने कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2018 5:57 pm

Web Title: after television actress mouni roy boyfriend actor mohit raina all set to make his bollywood debut
Next Stories
1 ‘तू माझा सांगती’ मालिकेत तुकोबांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस
2 ५०० एपिसोड पूर्ण! ‘गोठ’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन
3 Sanju : पंधरा वर्षांनंतर रणबीरच्या रुपात परत आलाय मुन्नाभाई
Just Now!
X