News Flash

‘थप्पड’नंतर तापसी-पवैल पुन्हा एकत्र, करणार अनुराग कश्यपच्या या चित्रपटात काम

जाणून घ्या चित्रपटाविषयी...

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘दोबारा’ असे असून चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत अभिनेता पवैल गुलाटी स्क्रीन शेअर करणार आहे.

‘थप्पड’ चित्रपटात तापसी आणि पवैल यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाने अनेकांची मने जिंकली होती. तसेच तापसी आणि पवैलची जोडी चर्चेत होती. आता ही जोडी ‘दोबारा’ या अनुराग कश्यपच्या चित्रपटात पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. याबाबत तापसीने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसीने ‘दोबारा’ चित्रपटाच्या सेटवरचा पवैलसोबत एक कँडिड फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने “माझी शेवटची सीरिज दोबारा. या व्यक्तीने थप्पड चित्रपटात काही गोष्टी अर्धवट ठेवल्या होत्या. त्यामुळे आता त्याला त्याची चूक सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. पवैल गुलाटी” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

‘दोबारा’ अनुराग कश्यप दिग्दर्शित असून एकता कपूर यांची कल्ट मूवीज़ आणि सुनीर खेतरपाल यांच्या एथेना द्वारा संयुक्त निर्मिती आहे. तापसी आणि पवैल यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 4:06 pm

Web Title: after thappad tapsi pannu will be seen again paval gulati avb 95
Next Stories
1 टायगर श्रॉफच्या बहिणीचा हॉट फोटो व्हायरल, सोशल मीडियावर चर्चेत
2 मलायकासमोर फोटोग्राफरवर भडकला अर्जुन कपूर, जाणून घ्या कारण
3 कंगनाच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट जारी
Just Now!
X