08 December 2019

News Flash

तीन लग्न करुनही एकटी राहते ही अभिनेत्री

ही अभिनेत्री जगातील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे

बॉलिवूडमध्ये सतत कलाकारांचे ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असतात. अनेक वेळा कलाकार घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करतात. मात्र हॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जिने तीन वेळा लग्न करुनही आता एकटी राहते. ही अभिनेत्री जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानली जाते.

अँजेलिना जोली असे या अभिनेत्रीचे नाव आहे. अँजेलिना जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. तिने ‘लुकिंग टू गेट आउट’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून भूमिका साकारत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. तिच्या या भूमिकेने चाहत्यांच्या मनावर जादूच केली होती. पण सुरुवातीला अँजेलिनाला अभिनयामध्ये रस नव्हता. मात्र आईसोबत चित्रपट पाहून तिच्या मनात चित्रपटांबाबत रुची निर्माण झाली आणि तिने अभिनयामध्ये करिअर करण्याचे ठरवले. अँजेलिना एक वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Angelina Jolie (@angelinajolieofficial) on

अँजेलिनाने आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. तरीही सध्या ती एकटी राहत आहे. तिने २८ मार्च १९९६ मध्ये जॉनी ली मिलरशी पहिले लग्न केले होते. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘हॅकर’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचे सूत जुळल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. अखेर लग्नाच्या तीन वर्षातच १९९९ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अँजेलिनाने अभिनेता बॉब थार्नटनशी दुसरे लग्न केले. परंतु अँजेलिनाचा हा संसारही फार काळ टिकला नाही. २००३ मध्ये तिने घटस्फोट घेतला.

आणखी वाचा : वाणी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पणाआधी करायची हे काम

त्यानंतर अँजेलिना काही काळ एकटी राहिली. २००५ मध्ये ब्रॅड पिट आणि अँजेलिनाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या नात्यामुळे ब्रॅड पिट आणि जेनिफर अॅनिस्टनचे लग्न मोडले. अँजेलिना आणि ब्रॅड पिट कित्येक दिवस लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी हॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र आधीच्या दोन लग्नांप्रमाणेच अँजेलिनाचे हे लग्नही फार काळ टिकले नाही. दोघांमध्ये सतत भांडणे होऊ लागली. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता अँजेलिना एकटी राहते.

First Published on October 9, 2019 6:07 pm

Web Title: after three marriage this actress is living alone avb 95
Just Now!
X